देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणी

खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. मात्र जून आणि जुलैमध्ये पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरणीला उशीर झाल्याने पीक उशिरा हाती येत आहे.
Only 27% of the country's soybean harvest
Only 27% of the country's soybean harvest

पुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. मात्र जून आणि जुलैमध्ये पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरणीला उशीर झाल्याने पीक उशिरा हाती येत आहे. तसेच सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या प्रारंभी पाऊस झाल्याने पीक काढणीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे १४ ऑक्टोबरपर्यंत देशातील लागवडीपैकी ३३.६९ लाख हेक्टरवरील म्हणजेच २७.६२ टक्के सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने  दिली.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात १४ ऑक्टोबरपर्यंत खरिपातील ४९ टक्के कडधान्याची काढणी पूर्ण झाली आहे. यंदा देशात उडदाची ३६.१५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी २७ लाख हेक्टरवरील, म्हणजेच ७५ टक्के उडदाची काढणी झाली आहे. तर मुगाची यंदा ३४.४२ लाख हेक्टरवर पेरणी होती, त्यापैकी आतापर्यंत २५.५९ लाख हेक्टर म्हणजेच ७४ टक्के मुगाची काढणी पूर्ण झाली आहे. २०२१-२२ च्या हंगामात यंदा तुरीची लागवड ४८.५२ लाख हेक्टरवर झाली होती. तुरीची काढणी डिसेंबर महिन्यात सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर इतर कडधान्य पिकांची पेरणी १६.१० लाख हेक्टरवर होती, त्यापैकी ८५ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. 

हंगाम २०२१-२२ मध्ये देशात सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. लागवडीपैकी ३३.६९ लाख हेक्टरवरील सोयाबीनची १४ ऑक्टोबरपर्यंत काढणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत एकूण पिकांपैकी २७.६२ टक्के सोयाबीन शेतकऱ्यांनी काढले. भुईमुगाचा विचार करता यंदा ४८ लाख हेक्टरवर देशात लागवड होती. तर आतापर्यंत ५.८३ लाख हेक्टर म्हणजेच १२ टक्के भुईमुगाची काढणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर तिळाची काढणी ७ टक्के झाली आहे, यंदा देशात १३.४१ हेक्टरवर तिळाची पेरणी झाली होती. 

मका काढणी ३१ टक्क्यांवर कृषी विभागाने दिलेल्या महितीनुसार देशात यंदा ज्वारीची १४.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. तर १४ ऑक्टोबरपर्यंत ज्वारीची लागवड ४.८६ लाख हेक्टरवरील, म्हणजेच ३३ टक्के ज्वारीची सोंगणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. बाजरीची यंदा ६२.५२ लाख हेक्टरवर पेरणी होती, त्यापैकी ३१.९ लाख हेक्टर म्हणजेच ५१ टक्के काढणी झाली आहे. मक्याची आतापर्यंत ३१ टक्के काढणी पूर्ण झाली असून, यंदा ७६.४७ लाख हेक्टरवर मका लागवड होती, त्यापैकी २३.७१ लाख हेक्टरवरील पीक काढणी झाली आहे.

भाताची काढणी ५ टक्क्यांवर देशात भाताखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदाच्या हंगामात २०२१-२२ मध्ये भाताची लागवड ही ४११.४६ लाख हेक्टरवर झाली होती. देशातील भाताची आतापर्यंत ५.१५ टक्के सोंगणी झाली आहे. म्हणजेच लागवड क्षेत्रापैकी केवळ २१.१९ लाख हेक्टरवरील भाताची काढणी पूर्ण झाली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने भात काढणीत अडचणी निर्माण झाल्या. तसेच अनेक भागांतील खाचरांमध्ये १५ दिवसांपर्यंत पाणी साचून होते, परिणामी भात काढणीला विलंब झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com