Agriculture news in Marathi Only 27% of the country's soybean harvest | Page 3 ||| Agrowon

देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. मात्र जून आणि जुलैमध्ये पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरणीला उशीर झाल्याने पीक उशिरा हाती येत आहे.

पुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. मात्र जून आणि जुलैमध्ये पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरणीला उशीर झाल्याने पीक उशिरा हाती येत आहे. तसेच सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या प्रारंभी पाऊस झाल्याने पीक काढणीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे १४ ऑक्टोबरपर्यंत देशातील लागवडीपैकी ३३.६९ लाख हेक्टरवरील म्हणजेच २७.६२ टक्के सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने 
दिली.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात १४ ऑक्टोबरपर्यंत खरिपातील ४९ टक्के कडधान्याची काढणी पूर्ण झाली आहे. यंदा देशात उडदाची ३६.१५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी २७ लाख हेक्टरवरील, म्हणजेच ७५ टक्के उडदाची काढणी झाली आहे. तर मुगाची यंदा ३४.४२ लाख हेक्टरवर पेरणी होती, त्यापैकी आतापर्यंत २५.५९ लाख हेक्टर म्हणजेच ७४ टक्के मुगाची काढणी पूर्ण झाली आहे. २०२१-२२ च्या हंगामात यंदा तुरीची लागवड ४८.५२ लाख हेक्टरवर झाली होती. तुरीची काढणी डिसेंबर महिन्यात सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर इतर कडधान्य पिकांची पेरणी १६.१० लाख हेक्टरवर होती, त्यापैकी ८५ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. 

हंगाम २०२१-२२ मध्ये देशात सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. लागवडीपैकी ३३.६९ लाख हेक्टरवरील सोयाबीनची १४ ऑक्टोबरपर्यंत काढणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत एकूण पिकांपैकी २७.६२ टक्के सोयाबीन शेतकऱ्यांनी काढले. भुईमुगाचा विचार करता यंदा ४८ लाख हेक्टरवर देशात लागवड होती. तर आतापर्यंत ५.८३ लाख हेक्टर म्हणजेच १२ टक्के भुईमुगाची काढणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर तिळाची काढणी ७ टक्के झाली आहे, यंदा देशात १३.४१ हेक्टरवर तिळाची पेरणी झाली होती. 

मका काढणी ३१ टक्क्यांवर
कृषी विभागाने दिलेल्या महितीनुसार देशात यंदा ज्वारीची १४.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. तर १४ ऑक्टोबरपर्यंत ज्वारीची लागवड ४.८६ लाख हेक्टरवरील, म्हणजेच ३३ टक्के ज्वारीची सोंगणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. बाजरीची यंदा ६२.५२ लाख हेक्टरवर पेरणी होती, त्यापैकी ३१.९ लाख हेक्टर म्हणजेच ५१ टक्के काढणी झाली आहे. मक्याची आतापर्यंत ३१ टक्के काढणी पूर्ण झाली असून, यंदा ७६.४७ लाख हेक्टरवर मका लागवड होती, त्यापैकी २३.७१ लाख हेक्टरवरील पीक काढणी झाली आहे.

भाताची काढणी ५ टक्क्यांवर
देशात भाताखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदाच्या हंगामात २०२१-२२ मध्ये भाताची लागवड ही ४११.४६ लाख हेक्टरवर झाली होती. देशातील भाताची आतापर्यंत ५.१५ टक्के सोंगणी झाली आहे. म्हणजेच लागवड क्षेत्रापैकी केवळ २१.१९ लाख हेक्टरवरील भाताची काढणी पूर्ण झाली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने भात काढणीत अडचणी निर्माण झाल्या. तसेच अनेक भागांतील खाचरांमध्ये १५ दिवसांपर्यंत पाणी साचून होते, परिणामी भात काढणीला विलंब झाला.


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...