Agriculture news in Marathi Only 27% of the country's soybean harvest | Agrowon

देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 ऑक्टोबर 2021

खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. मात्र जून आणि जुलैमध्ये पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरणीला उशीर झाल्याने पीक उशिरा हाती येत आहे.

पुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. मात्र जून आणि जुलैमध्ये पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरणीला उशीर झाल्याने पीक उशिरा हाती येत आहे. तसेच सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या प्रारंभी पाऊस झाल्याने पीक काढणीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे १४ ऑक्टोबरपर्यंत देशातील लागवडीपैकी ३३.६९ लाख हेक्टरवरील म्हणजेच २७.६२ टक्के सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने 
दिली.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात १४ ऑक्टोबरपर्यंत खरिपातील ४९ टक्के कडधान्याची काढणी पूर्ण झाली आहे. यंदा देशात उडदाची ३६.१५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी २७ लाख हेक्टरवरील, म्हणजेच ७५ टक्के उडदाची काढणी झाली आहे. तर मुगाची यंदा ३४.४२ लाख हेक्टरवर पेरणी होती, त्यापैकी आतापर्यंत २५.५९ लाख हेक्टर म्हणजेच ७४ टक्के मुगाची काढणी पूर्ण झाली आहे. २०२१-२२ च्या हंगामात यंदा तुरीची लागवड ४८.५२ लाख हेक्टरवर झाली होती. तुरीची काढणी डिसेंबर महिन्यात सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर इतर कडधान्य पिकांची पेरणी १६.१० लाख हेक्टरवर होती, त्यापैकी ८५ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. 

हंगाम २०२१-२२ मध्ये देशात सोयाबीनची लागवड १२१.९७ लाख हेक्टरवर झाली होती. लागवडीपैकी ३३.६९ लाख हेक्टरवरील सोयाबीनची १४ ऑक्टोबरपर्यंत काढणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत एकूण पिकांपैकी २७.६२ टक्के सोयाबीन शेतकऱ्यांनी काढले. भुईमुगाचा विचार करता यंदा ४८ लाख हेक्टरवर देशात लागवड होती. तर आतापर्यंत ५.८३ लाख हेक्टर म्हणजेच १२ टक्के भुईमुगाची काढणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर तिळाची काढणी ७ टक्के झाली आहे, यंदा देशात १३.४१ हेक्टरवर तिळाची पेरणी झाली होती. 

मका काढणी ३१ टक्क्यांवर
कृषी विभागाने दिलेल्या महितीनुसार देशात यंदा ज्वारीची १४.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. तर १४ ऑक्टोबरपर्यंत ज्वारीची लागवड ४.८६ लाख हेक्टरवरील, म्हणजेच ३३ टक्के ज्वारीची सोंगणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. बाजरीची यंदा ६२.५२ लाख हेक्टरवर पेरणी होती, त्यापैकी ३१.९ लाख हेक्टर म्हणजेच ५१ टक्के काढणी झाली आहे. मक्याची आतापर्यंत ३१ टक्के काढणी पूर्ण झाली असून, यंदा ७६.४७ लाख हेक्टरवर मका लागवड होती, त्यापैकी २३.७१ लाख हेक्टरवरील पीक काढणी झाली आहे.

भाताची काढणी ५ टक्क्यांवर
देशात भाताखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदाच्या हंगामात २०२१-२२ मध्ये भाताची लागवड ही ४११.४६ लाख हेक्टरवर झाली होती. देशातील भाताची आतापर्यंत ५.१५ टक्के सोंगणी झाली आहे. म्हणजेच लागवड क्षेत्रापैकी केवळ २१.१९ लाख हेक्टरवरील भाताची काढणी पूर्ण झाली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने भात काढणीत अडचणी निर्माण झाल्या. तसेच अनेक भागांतील खाचरांमध्ये १५ दिवसांपर्यंत पाणी साचून होते, परिणामी भात काढणीला विलंब झाला.


इतर बातम्या
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...
शेतीपंपाच्या वीज जोडण्या खंडित...नाशिक: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मका...
मराठवाड्याच्या वाट्याला ९ कोटी ९० लाख...औरंगाबाद : राज्यातील मागेल त्याला शेततळे...
सोलापूर जिल्ह्याला शेततळ्यांचे रखडलेले...सोलापूर ः राज्य शासनाच्या मागेल त्याला शेततळे या...
अकोला जिल्ह्यात करडईची साडेसातशे...अकोला ः तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नांदेड विभागात २१ कारखाने सुरुनांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर)...
सांगली जिल्ह्यात महिन्यात साडे पंधरा...सांगली ः जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा १३ साखर...
सोलापूर : ऊसबिलासाठी महिन्यापासून सुरू...सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर...
गटशेतीद्वारे उत्पादनात वाढ होईल ः डॉ....रत्नागिरी ः ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार...
जळगाव : करपात्र १५,१३३ लाभार्थी शेतकरी...जळगाव : शेतकऱ्यांना केंद्र शासनाव्दारे मदतीपोटी...
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला...पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशत:...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषी सुधारणांचा अंत की पुनरुत्थान? :...केंद्र सरकारने पुन्हा एक समिती नेमून नव्याने...
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे...पुणे ः देशातील असंघटित कामगार व मजुरांना ई-...
पुढील लढाई तरुणांना लढावी लागेल : राकेश...केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द...
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र :...केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेले तीन कृषी...
जळगाव जिल्ह्यात मतदारयाद्यांवर १५ हजार...जळगाव ः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार...
विसापुरात ७४ वीजजोड तोडले; शेतकरी...विसापूर, जि. सांगली :  येथील ७४ शेतकऱ्यांचे...