दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
वर्धा जिल्ह्यात रब्बीत २८ टक्के कर्ज वितरण
वर्धा ः खरिपासह रब्बी हंगामातही कर्जवाटपात बॅंकांची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. मॉन्सूनोत्तर पावसाने जमिनीत ओलावा बऱ्यापैकी आहे. त्यामुळे रब्बी क्षेत्र दुपटीने वाढणार असल्याचे संकेत असताना कर्ज वाटप मात्र अवघे २८ टक्केच झाले आहे.
वर्धा ः खरिपासह रब्बी हंगामातही कर्जवाटपात बॅंकांची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. मॉन्सूनोत्तर पावसाने जमिनीत ओलावा बऱ्यापैकी आहे. त्यामुळे रब्बी क्षेत्र दुपटीने वाढणार असल्याचे संकेत असताना कर्ज वाटप मात्र अवघे २८ टक्केच झाले आहे.
खरिपासाठी जिल्ह्यातील बॅंकांना ८८२ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी केवळ ३३२ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप बॅंकांकडून करण्यात आले. खरीप हंगामात वेळोवेळी शासन, प्रशासन स्तरावरून कर्ज वितरणाची गती वाढविण्यासाठी बॅंकांना निर्देश देण्यात आले. परंतु, त्याचा काही एक परिणाम बॅंकांवर झाला नाही. परिणामी खरीप हंगामात बॅंका कर्ज वितरणात पिछाडल्या.
या वर्षी मॉन्सूनोत्तर पावसामुळे सिंचन प्रकल्पाची पातळी चांगली आहे. नद्या, नाल्यांनादेखील पाणी आहे. सोबतच जमिनीत ओलावा असल्याने रब्बी हंगाम क्षेत्र दुपटीने वाढण्याचे संकेत आहेत.
अशा स्थितीत कर्ज वितरणाची गती वाढणे अपेक्षित असताना आत्तापर्यंत केवळ २८ टक्केच कर्जवाटप होऊ शकले. रब्बी हंगामासाठी ९८ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे. आजवर केवळ २८ कोटी रुपयांचेच कर्जवाटप बॅंकांनी केले आहे. कर्जाचे नूतनीकरण न करणे, शिवाय अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. त्यासोबतच मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने असलेली नापिकी, यामुळे कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना करता आली नाही. यामुळे शेतकऱ्यांनीदेखील बॅंकांकडे पाठ फिरविल्याचे सांगितले जाते.
खासगी व्यक्तींकडून उसनवारी करूनच रब्बी हंगामात निविष्ठांसाठी लागणाऱ्या पैशाची सोय करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
बॅंकांची उदासीनता चव्हाट्यावर
जिल्ह्यात खरिपात ४ लाख ५ हजार ६२८ हेक्टर पेरा होता. रब्बीचे २७ नोव्हेंबरपर्यंत २१ हजार ६७० हेक्टर इतके पेरणी क्षेत्र होते. खरिपाचे नियोजन करतेवेळी बॅंकांकडून रब्बीचेही नियोजन केले जाते. परंतु, रब्बी हंगामात बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याची वस्तुस्थिती आहे.
- 1 of 1023
- ››