agriculture news in Marathi only 35 oilseed seed hub established in country Maharashtra | Agrowon

देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मिती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

नवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने २०१९-२० (एप्रिल ते मार्च) मध्ये १५० तेलबिया हब उभारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणे वाणांची पैदास करण्याचे काम या हबमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, आतापर्यंत उद्दिष्टापैकी केवळ ३५ तेलबिया हबची उभारणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने २०१९-२० (एप्रिल ते मार्च) मध्ये १५० तेलबिया हब उभारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणे वाणांची पैदास करण्याचे काम या हबमध्ये करण्यात येणार आहे. मात्र, आतापर्यंत उद्दिष्टापैकी केवळ ३५ तेलबिया हबची उभारणी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

देशात तेलबिया उत्पादनात मागणीच्या तुलनेत तूट आहे. त्यामुळे भारत हा जगात सर्वाधिक तेलबिया आयात करणारा देश आहे. २०१८-१९ मध्ये देशात १५० लाख टन खाद्यतेल आयात झाली आहे. या आयात खाद्यतेलाचे मूल्य साडेसात हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे खाद्यतेलावरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने उच्च उत्पादन देण्यारे बियाणे आणि इतर शेतीयोग्य निविष्ठा पुरवठा करण्यासाठी १५० तेलबिया हब उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. 

‘‘देशात तेलबिया उत्पादन वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी पूर आणि कीड-रोगप्रतिकारक वाण उत्पादनासाठी अधिकाधीक बियाणे हबची आवश्‍यकता आहे. कडधान्य बियाणे हबचे स्थापना करण्याचे काम सतत सुरू असावे. तेलबिया बियाणे हब हे कृषी विज्ञान केंद्र आणि भारतीय कृषी संशोधन परिषेदेच्या केंद्रांमध्ये उभारण्यात येत आहे, ’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एक कोटी लिटर खाद्यतेल उत्पादन 
देशात २०१७०१८ मध्ये तेलबियांचे ३१५ लाख टन उत्पादन झाले होते. तर, २०१८-१९ मध्ये ३२३ लाख टन उत्पादन झाले होते. २०१९-२० च्या खरीप हंगामात २२४ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मागील वर्षी खरिपात २१३ लाख टन तेलबिया उत्पादन झाले होते. देशातील एकूण तेलबिया उत्पादनातून केवळ एक कोटी लिटर खाद्यतेल उत्पादन होते. तर, देशाची गरज २.५ ते २.६ कोटी लिटरची आहे. उर्वरित १.५ कोटी लिटर आयात केले जाते आणि त्यावर जवळपास साडेसात हजार कोटी खर्च होतो.


इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...