Agriculture news in Marathi, Only 38 percent of the saplings planted by the Zilla Parishad survive | Agrowon

जिल्हा परिषदेने तीन वर्षांत लावलेली ३८ टक्केच रोपे जिवंत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नगर ः शासनाचे ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. सगळी सरकारी यंत्रणा या नियोजनात गुंतलेली आहे. परंतु, लागवडीनंतर रोपण केलेल्या वृक्षांची काळजी घेतली जाते का? हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीतच आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात करण्यात आलेली वृक्षलागवड चिंतनीय आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत त्यांनी लावलेल्या २० लाख ३० हजार वृक्षांपैकी फक्त ७ लाख ८१ हजार झाडेच जिवंत असल्याची माहिती त्यांच्याकडूनच प्राप्त झाली. जिवंत वृक्षाची टक्केवारी फक्त ३८ टक्केच आहे.

नगर ः शासनाचे ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. सगळी सरकारी यंत्रणा या नियोजनात गुंतलेली आहे. परंतु, लागवडीनंतर रोपण केलेल्या वृक्षांची काळजी घेतली जाते का? हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीतच आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात करण्यात आलेली वृक्षलागवड चिंतनीय आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत त्यांनी लावलेल्या २० लाख ३० हजार वृक्षांपैकी फक्त ७ लाख ८१ हजार झाडेच जिवंत असल्याची माहिती त्यांच्याकडूनच प्राप्त झाली. जिवंत वृक्षाची टक्केवारी फक्त ३८ टक्केच आहे.

वृक्षलागवडीत सामाजिक संस्था, खासगी संस्था किंवा व्यक्तीने लावले, तर त्याची निगा राखली जाते. परंतु शासकीय यंत्रणेने झाड लावले तर त्याची पाहिजे तशी निगा राखली जात नसल्याचा इतिहास आहे. राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीची मोहिमही शासनाने अशीच गाजावाजा करत सुरू करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधींच्या निधीचे नियोजनही करण्यात आले. आतापर्यंत २४ कोटी झाडे लावली आहेत. या मोहिमेत आजतागायत साडेबासष्ट लाख नागरिकांनी सहभाग घेतला.

जिल्ह्यातही सव्वा कोटी झाडांचे नियोजन आहे. त्यात जिल्हा परिषदेला ४२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. परंतु, हे सगळे करताना यापूर्वी लावलेल्या झाडांची स्थिती काय, हा प्रश्‍न आहे. या बाबत माहिती घेतली असता धक्कादायक स्थिती समोर आली. जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांत गेल्या तीन वर्षांत (२०१६, २०१७ आणि २०१८) २० लाख २९ हजार २२२ झाडे लावण्यात आली. मात्र, त्यापैकी फक्त ७ लाख ८० हजार ४६४ झाडेच जिवंत आहेत. झाडे जिवंत असण्याची टक्केवारी फक्त ३८.४६ टक्के आहे. दरवर्षी झाड नवीन असले तरी, खड्डा मात्र तोच असतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

कमी वयाच्या रोपांचाही परिणाम
शासनाच्या वृक्षलागवड योजनेत वन विभागाकडून रोपे पुरवली जातात. लागवडीसाठी किमान १८ महिने वयाची रोपे मिळणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही. लागवडीसाठी वन विभागाकडून अत्यंत कमी वयाची रोपे पुरवली जातात. झाडे वाचवण्यासाठी खास यंत्रणा नसल्याने जास्ती वयाची झाडे मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषेदने केली होती. मात्र, तसे झाले नाही. झाडे जगण्यात कमी वयाच्या रोपांचाही परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

तालुकानिहाय जिवंत झाडांची टक्केवारी ः  अकोले ः ४६.१०, संगमनेर ः ४१.३७, कोपरगाव ः ४३.८४, राहाता ः ५३.५०, श्रीरामपुर ः ४२.२०, राहुरी ः ४४.९०, नेवासा ः ४४.८३, शेवगाव ः ३४.५४, पाथर्डी ः २६.५८, जामखेड ः २५.२६, जामखेड ः ६२.३५, श्रीगोंदा ः ३६.३४, पारनरे ः २७.१८, नगर, ः २०.५०


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...