मराठवाड्यात आता फक्‍त ३९ चारा छावण्या सुरू

चारा छावणी
चारा छावणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये ५ जुलैअखेर ३९ चारा छावण्या सुरू असून, या छावण्यांमध्ये केवळ २४ हजार ९६ जनावरे दावणीला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  २९ जूनअखेर मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १३० चारा छावण्या सुरू होत्या. त्यामध्ये ६९ हजार ८४० जनावर होती. त्याआधी २४ जूनअखेर मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल ६६८ चारा छावण्या सुरू होत्या. तर या चारा छावण्यांमध्ये ४ लाख ४० हजार ७८८ जनावरे होती. अपेक्षित पाऊस नसला व चाऱ्याची उपलब्धता झाली नसली तरी, मराठवाड्यातील चारा छावण्या व त्यामधील जनावरांची संख्या मात्र झपाट्याने घटली आहे.  मराठवाड्यात यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ११५३ चारा छावण्याना मंजुरात देण्यात आली होती. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६५, जालना जिल्ह्यातील ४८, परभणी जिल्ह्यातील १, बीड जिल्ह्यातील ९३३ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १०६ चारा छावण्यांचा समावेश होता. २४ जूनअखेरपर्यंत या छावण्या मंजूर झालेल्या जिल्ह्यातील ६६८ चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू होत्या. या छावण्यांमध्ये मोठी ४ लाख ६ हजार ८२७,  तर लहान ३३ हजार ९६१ जनावरे मिळून ४ लाख ४० हजार ७८८ जनावरांचा समावेश होता. त्यांनतर अवघ्या पाच दिवसांत औरंगाबाद, जालना, परभणी, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील छावण्या तब्बल ५३८ चारा छावण्या कमी झाल्या. त्यामुळे सहाजिकच छावण्यांमधील जनावरांच्या संख्येतही घट झाली.  आता पुन्हा सुरू असलेल्या चारा छावण्यांची संख्या ५ जुलैअखेर ३९ वर आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २, परभणीमधील १, बीडमधील १२, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २४ चारा छावण्यांचा समावेश आहे. या चारा छावण्यांमध्ये मोठी २२ हजार ३४०,  तर लहान १७५६ मिळून २४ हजार ९६  जनावरे होती. या जनावरांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २ हजार ५४४, परभणीमधील ५००, बीड ६ हजार ६३७, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ हजार ४१५ जनावरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लांबलेल्या पावसामुळे चाऱ्याचीही लांबणीवर पडलेली उपलब्धता पाहता पुन्हा एकदा पशुपालकांसमोर चारा संकट अधीक गंभीर होण्याची चिन्ह आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com