सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४ शेततळी

Only 44 farms in the district in two and a half months
Only 44 farms in the district in two and a half months

सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह्यात प्रतिसाद कमी होऊ लागला आहे.  जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत केवळ ४४ शेततळी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात १९०० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. संरक्षित पाण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती करण्याबरोबर अनुदानाबरोबर वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. ही योजना सर्वसमावेशक झाल्यानंतर जिल्ह्यातून या योजनेस प्रतिसाद वाढला होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेस प्रतिसाद कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात ठेवण्यात आलेल्या दोन हजार शेततळ्यांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे सहा हजार ८२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पाच हजार ४८० अर्ज पात्र, तर एक हजार ३०९ अर्ज अपात्र ठरले असून, १२ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जांपैकी चार हजार ५३३ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. तीन हजार ५९६ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे.

सध्या ६३ शेततळ्यांची काम सुरू असून, १९०० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. युती शासनाच्या काळात मागेल त्याला शेततळे या नावाने ही योजना समावेशक करत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लागू करण्यात आली. मात्र, या नवीन योजनेत पूर्वीच्या तुलनेत अनुदानाची रक्कम कमी करण्यात आली होती. संरक्षित पाणीसाठ्यासाठी शेततळे फायदेशीर असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळे उभारणे आवश्यक असल्याने कृषी विभागाने पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे.

तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे  सातारा ११२, कोरेगाव २४७, खटाव ३३९, माण ३९५, फलटण ३५८, वाई ९९, खंडाळा १११, महाबळेश्वर १५, जावली २२, पाटण ८४, कऱ्हाड ११८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com