सोलापूर जिल्ह्यात केवळ ५७३ कोटींचे पीक कर्जवाटप

सोलापूर जिल्ह्यात केवळ ५७३ कोटींचे पीक कर्जवाटप
सोलापूर जिल्ह्यात केवळ ५७३ कोटींचे पीक कर्जवाटप

सोलापूर : जिल्ह्यात यंदाही दुष्काळाची परिस्थिती तीव्र झाल्याने पीककर्जाला मागणी कमीच आहे. पण बॅंकाही तेवढ्या पुढाकाराने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत पीककर्ज वाटपाचा आकडा खाली आहे. गतवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ६०३ कोटी २५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. यंदा ४२ हजार ९३ शेतकऱ्यांना ५७३ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. 

अलाहाबाद, आंध्रा, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक यासह सार्वजनिक क्षेत्रातील २० बॅंकांनी आतापर्यंत १८ हजार ३४३ शेतकऱ्यांना ३१७ कोटी रुपयांचे वाटप केले. या बॅंकांना खरिपात कर्जवाटपासाठी ९१६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

दिलेल्या उद्दिष्टाच्या ३४ टक्केच कर्जवाटप या बॅंकांनी केले. युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, आंध्रा बॅंक यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक रुपयाचेही कर्जवाटप केले नव्हते. ऍक्‍सिस, फेडरेरल, एचडीएफसी, आयसीआयसीआय यासह खासगी क्षेत्रातील नऊ बॅंकांनी सहा हजार ३६२ शेतकऱ्यांना १२० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. या बॅंकांना १३५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ८८ टक्के वाटप या बॅंकांनी केले.

जिल्हा बॅँकेकडूनही निराशा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने १६ हजार २१७ शेतकऱ्यांना १२१ कोटी रुपयांचे वाटप केले. या बॅंकेला ३०३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. एकूण उद्दिष्टाच्या ४० टक्केच वाटप डीसीसीने केले आहे. विदर्भ कोकण बॅंकेनेही पीककर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केल्याचे दिसत नाही. या बॅंकेने फक्त उद्दिष्टाच्या २५ टक्केच पीककर्ज वाटप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com