Agriculture news in marathi Only 64% crop loan disbursement from Nashik District Bank | Agrowon

नाशिक जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्केच पीक कर्जवाटप

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

नाशिक : पैशांची तरतूद नसल्याने सुरुवातीला कर्जवितरण करण्यात अडचणी आल्या. सोमवार (ता.२४) अखेर ६४ टक्के कर्जवितरण झाल्याची माहिती बँकेतर्फे देण्यात आली.

नाशिक : चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी अग्रणी बँकेने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला होता. मात्र पैशांची तरतूद नसल्याने सुरुवातीला कर्जवितरण करण्यात अडचणी आल्या. त्यानंतर महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेद्वारे रक्कम बँकेकडे वर्ग झाली. सोमवार (ता.२४) अखेर ६४ टक्के कर्जवितरण झाल्याची माहिती बँकेतर्फे देण्यात आली. 

जिल्ह्यात खरीप पीक कर्जवाटप अडकून पडले. मागील महिन्यात जिल्हा बँकेला महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेद्वारे ८७० कोटी रुपये वर्ग झाले आहेत. त्यामुळे पीककर्ज वितरणाच्या कामात गती आली. त्यामुळे आतापर्यंत २७९.२१ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले. यासंदर्भात राज्य शासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. नुकतीच सहकारमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसद्वारे सहकार विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.त्यात कर्ज वितरणास गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वच यंत्रणा गतिमान झाल्याने ही आकडेवारी वाढत असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. 

१ एप्रिलपासून खरीप पीककर्ज वितरण सुरू झाले. सर्वाधिक वाटप निफाड तालुक्यात झाले. सर्वात कमी वितरण सुरगाणा तालुक्यात आहे. मात्र अजूनही चांदवड, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, सटाणा, कळवण तालुक्यात कामकाजात गती येणे अपेक्षित आहे. यात गती येऊन बँकेने अजूनही जे अर्ज करत आहेत, त्यांना तातडीने कर्ज द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...