Agriculture news in marathi, Only 69,000 farmers prefer e-crop registration in Sangli district | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यातील ई-पीक नोंदणीला केवळ ६९ हजार शेतकऱ्यांची पसंती

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

सांगली ः  राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पीक पाहणी ॲपवर जिल्ह्यातील ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी केवळ आजअखेर अत्यल्प म्हणजे ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी, तर ६४ हजार शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केल्याचे स्पष्ट होत आहे.

सांगली ः  राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ई-पीक पाहणी ॲपवर जिल्ह्यातील ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी केवळ आजअखेर अत्यल्प म्हणजे ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी, तर ६४ हजार शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केल्याचे स्पष्ट होत आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांत जागृती करण्यात कृषी व महसूल विभागातील समन्वयाचा अभावही अनेक ठिकाणी दिसून येत आहे. 

राज्य सरकारने ई-पीक पाहणी अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामध्ये शेतकरी स्वत: आपल्या ७/१२ वर पिकांची नोंदणी करता येते. पिकांच्या नोंदणीसाठी चावडीमध्ये जाण्याचे हेलपाटे वाचणार आहेत.

‘माझा सात-बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा,’ ही घोषणा करीत योजना १४ ऑगस्ट रोजी सुरवात झाली. राज्य शासनाने १५ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. सरकारने पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत तरी नोंदणी पूर्ण क्षमतेने व्हावी, यासाठी कृषी, महसूलला प्रयत्न करावे लागतील. 

जिल्ह्यातील नोंदणीची आकडेवारी पाहता छोट्या तालुक्याचे काम चांगले आहे.  तर मोठ्या तालुक्यात अतिशय धिम्या गतीने काम सुरू असल्याचे स्पष्ट होते. मिरज, जत, वाळवा तालुके मोठे असताना नोंदणी कमी दिसते आहे. कडेगाव, आटपाडी, पलूस तालुक्यांचे काम चांगले झाले आहे. 


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...