agriculture news in marathi Only 767 tons of DAP left in Parbhani | Page 2 ||| Agrowon

परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021

परभणी : जिल्ह्यात ऐन पेरणीच्या वेळी जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 

परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या वापरानुसार तसेच यंदा क्षेत्रात वाढ गृहीत धरून विविध ग्रेडच्या १ लाख ५४ हजार २०० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. परंतु कृषी आयुक्तालयाकडून ६० हजार ४३० टन एवढा म्हणजेच मागणीपेक्षा ९३ हजार ७७० टन कमी खतासाठा मंजूर करण्यात आला. त्यातही मंजूर साठ्यापेक्षा कमी पुरवठा केला जात आहे. ऐन पेरणीच्या वेळी जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 

रब्बी हंगामात ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत महिनानिहाय मंजूर खतसाठ्यानुसार पुरवठा केला जातो. यंदा ऑक्टोबर महिन्यासाठी विविध ग्रेडच्या रासायनिक खतांचा १० हजार टन साठा मंजूर आहे. परंतु आजवर केवळ १ हजार ८०० टन (१८ टक्के) खतांचा पुरवठा झाला आहे. त्यात युरिया १ हजार ४५० टन आणि संयुक्त खते ३५० टन यांचा समावेश आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर ७३ जार २०० टन आहे. यंदा आयुक्तालयाकडून मंजूर खतसाठ्यात युरिया २० हजार ७७० टन, डीएपी ७ हजार १२० टन, पोटॅश १ हजार ९९० टन, सुपर फॉस्फेट १० हजार २७० टन, एनपीके ५ हजार टन या खतांचा समावेश आहे. 

३० सप्टेंबर अखेर विविध ग्रेडचा १९ हजार ७३७ टन खतसाठा शिल्लक होता. सोमवारी (ता.८) विविध ग्रेडचा २५ हजार टन खतसाठा शिल्लक होता. त्यात डीएपी ७६७ टन, युरिया ८ हजार ६०८ टन, एऩपीके (संयुक्त खते) १० हजार ४८१ टन या प्रमुख खतांचा समावेश आहे. अनेक विक्रेत्यांकडून पीओएस मशिनवर नोंदणी केली जात नसल्यामुळे खतसाठा शिल्लक दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक विक्री केंद्रावरील फलकावर खतसाठा निरंक दिसत आहे. 

ऑक्टोबर महिन्यात मंजूर खतसाठ्यानुसार युरिया आणि एनपीके प्रत्येकी ५ हजार टन आणि डीएपी ४५० टन एवढा पुरवठा झाला. नोव्हेंबर महिन्यात युरिया २ हजार ८०० टन,डीएपी १ हजार ८०० टन, एऩपीके ८०० टन एवढा खतसाठा उपब्लध होणार आहे. मंजूर साठ्यापेक्षा कमी पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होत नाही. 

प्रतिक्रिया...
खताच्या किमती वाढल्या आहेत. रब्बीसाठी शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. पुरवठा केला जात नाही.त्यामुळे व्यापारी चढ्या दराने खताची विक्री करत आहेत. शेतकऱ्यांचे दुहेरी आर्थिक नुकसान होत आहे. पुरेसा खतसाठा उपलब्ध करून द्यावा. शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी, कष्टकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. 
- विलास बाबर,
सुरपिंपरी, ता. परभणी 


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...