नांदेड जिल्ह्यात रब्बीचे ८ टक्केच पीक कर्जवाटप

only 8 percent rabbi crop loan distributed In Nanded district
only 8 percent rabbi crop loan distributed In Nanded district

नांदेड : ‘‘जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात बुधवार (ता. १) पर्यंत विविध क्षेत्रांतील बॅंकांनी ३ हजार ८२९ शेतकऱ्यांना ४१ कोटी ७४ लाख (८ टक्के) पीक कर्जवाटप केले आहे,’’ अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी दिली. सर्वच बॅंकांची पीक कर्जवाटपाची गती संथ आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्जवाटपाची गती वाढविण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यंदा जिल्ह्यातील बॅंकांना एकूण ४९१ कोटी ८८ लाख रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना ३४० कोटी २ हजार रुपये, खासगी बॅँकांना ३७ कोटी ९२ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ६९ कोटी २९ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला ४४ कोटी ६५ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. बुधवार (ता. १) पर्यंत राष्ट्रीयकृत बॅंकांनी १ हजार ४८३ शेतकऱ्यांना १२ कोटी ४७ लाख रुपये (४ टक्के), खासगी बॅंकांनी ६३८ शेतकऱ्यांना १६ कोटी ४३ लाख रुपये (४.३३ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १ हजार ७०८ शेतकऱ्यांना १२ कोटी ८४ लाख रुपये (१९ टक्के) पीक कर्जवाटप केले.

राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण बॅंकांनी मिळून एकूण ३ हजार ८२९ शेतकऱ्यांना ४१ कोटी ७४ लाख रुपये (८ टक्के) एवढे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कर्जवाटप सुरू केले नसल्याची स्थिती  आहे.

खरिपात २६.०५ टक्के वाटप

खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ९६७ कोटी ५१ लाख रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांना १ हजार ३६० कोटी ७ लाख रुपये, खासगी बॅंकांना १५१ कोटी ६७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २७७ कोटी १७ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला १७८ कोटी ६० लाख रुपये उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ४० हजार ८४९ शेतकऱ्यांना १२० कोटी ९ लाख रुपये (८.८३ टक्के), खासगी बॅंकांनी २ हजार ६९४ शेतकऱ्यांना ५० कोटी ८७ लाख रुपये (३३.५४ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १५ हजार ५७३ शेतकऱ्यांना ९७ कोटी ५० लाख रुपये (३५.१८ टक्के), जिल्हा बॅंकेने ५९ हजार २९ शेतकऱ्यांना २४४ कोटी ४ लाख रुपये (१३६.६४ टक्के) असे सर्व बॅंकांनी एकूण १ लाख १८ हजार १४५ शेतकऱ्यांना ५१२ कोटी २५० लाख (२६.०५ टक्के) पीक कर्जवाटप केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com