agriculture news in Marathi only dates on agriculture laws Maharashtra | Agrowon

कृषी कायद्यांवर ‘तारीख पे तारीख’ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम होते, तर सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांनी ताठर भूमिका सोडून कायद्यांत आवश्‍यक सुधारणा सुचविण्यास सांगितले.

नवी दिल्ली ः शेतकरी नेते कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम होते, तर सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांनी ताठर भूमिका सोडून कायद्यांत आवश्‍यक सुधारणा सुचविण्यास सांगितले. दोन्ही बाजूंनी आपली भूमिका रेटल्याने शेतकरी नेते आणि सरकारमधील चर्चेची नववी फेरी शुक्रवारी (ता. १५) कोणत्याही तोडग्याविना पार पडली. चर्चेची पुढील फेरी आता मंगळवारी (ता. १९) होणार आहे. 

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या आठ फेऱ्या संपूनही तोडगा निघाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने तोडग्यासाठी समिती स्थापन केल्यानंतरही सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा सरूच आहे. शुक्रवारी तब्बल पाच तास बैठक चालली. बैठकीच्या सुरुवातीलाच कृषिमंत्री तोमर यांनी शेतकरी नेत्यांना लवचिक भूमिका घेण्याचे आवाहन केले. 

कृषिमंत्री तोमर म्हणाले, की आम्ही शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. तरी तुम्ही सरकार प्रतिष्ठेचा विषय बनवत असल्याचे म्हणत आहेत. तुम्हाला असे वाटत नाह का की तुम्ही ताठर भूमिका सोडून कृषी कायदे रद्द करण्याची लावलेली एकाच मागणीवर अडून बसू नये, असे शेतकरी नेते बलजितसिंग बाली म्हणाले. 

प्रतिक्रिया
शेतकरी नेते आपल्या मागणीवर ठाम होते. आम्ही सरकारकडे नवीन तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. परंतु सरकारने असे करण्या नकार देत सुधारणा सुचविण्यास सांगितले. आम्ही आता १९ जानेवारीला दुपारी १२ वाजता पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले आहे. 
- जोगिंदरसिंग उग्रहान, शेतकरी नेते 

सरकारने आम्हाला सांगितले, की शेतकरी आंदोलनावर कोर्टात नाही तर चर्चेतून तोडगा निघेल. सर्वांचे याबाबतीत एकमत आहे. त्यामुळे आंदोलनाच्या तिढ्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. 
- राकेश टिकैत, शेतकरी नेते  


इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू संशोधन संस्था करतात काय?आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत...
शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे मारता, देश...मुंबई : ‘‘दिल्लीत शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत....
वाईत हळदीला उच्चांकी भावसातारा : शेतकऱ्यांचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती...मुंबई : राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष...
मुंबई बाजार समितीत खरेदी-विक्री होणार...पुणे ः बदलत्या पणन कायद्यांमुळे बाजार...
दोन आठवड्यांत ‘एफआरपी’चे सव्वादोन हजार...पुणे : साखरेला कमी भाव व निर्यातीत अनेक समस्या...
विदर्भात कमाल तापमानात वाढपुणे ः कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढू...
आता भाजपविरोधात प्रचार करणार : संयुक्त...नवी दिल्ली ः केंद्राच्या नव्या कृषी...
उत्पादन, दर्जावाढीसाठी आंबा पुनरुज्जीवन...चांदोर (ता. जि. रत्नागिरी) येथील दत्ताराम राघो...
सैनिकाने केले बीजोत्पादनाचे तंत्र...भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर तांभेरे (ता....
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही ः ...मुंबई ः हवे तर सरकारने चार-पाच हजार कोटी रुपयांचे...
कृषी संचालक ‘कॅबिन’ बाहेर पडले पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयात बसलेल्या...
ऊन वाढण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी...
कोकणात यंदा उन्हाचा पारा चढणार पुणे : राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू...
नवती केळीचे दर १३५० रुपये प्रतिक्विंटल जळगाव ः खानदेशात नवती केळीचे दर वधारून कमाल १३५०...
बाजारबंद, वेळांच्या निर्बंधांचा ...अकोला ः कोरोनामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या...
द्राक्ष व्यापारी नोंदणीला यंदाही...सांगली ः हंगामात द्राक्षाची खरेदी करण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी निधी देणार : दादा भुसेमुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता...
तंत्रज्ञानाच्या जोरावर रेशीम उद्योग...रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने...