Agriculture news in marathi Only to the favored farmers The benefit of crop insurance given | Page 2 ||| Agrowon

मर्जीतल्या शेतकऱ्यांनाच दिला पीकविम्याचा लाभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांऐवजी मर्जीतील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी भारती अक्सा कंपनीच्या प्रतिनिधींकडून चुकीचे पंचनामे करण्यात आले.

सिन्नर, जि. नाशिक :  गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांऐवजी मर्जीतील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी भारती अक्सा कंपनीच्या प्रतिनिधींकडून चुकीचे पंचनामे करण्यात आले. शेतकऱ्यांना पिकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित विमा प्रतिनिधी विरोधात कारवाई करण्याची मागणी पिंपरवाडी येथील शिष्टमंडळाने सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे केली आहे. 

तालुक्यातील पिंपरवाडी येथील शेतकऱ्यांनी भारती अक्सा कंपनीमार्फत पीकविमा योजनेत सहभाग नोंदवला होता. ऑक्टोबर २०२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. मात्र, संबंधित कंपनीचा प्रतिनिधीने वैयक्तिक हितसंबंध जपत नुकसान नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून दिला. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात नुकसान झाले होते, त्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले. या बाबत वारंवार मागणी करूनही संबंधित विमा प्रतिनिधीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

     पिकांच्या नुकसानीची संयुक्त पाहणी करून पंचनामे होणे अपेक्षित होते. मात्र विमा प्रतिनिधीने मर्जीतल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू दिला नाही, असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विजय गुरुळे, विष्णू गायकवाड, हरिभाऊ कापसे, नवनाथ गायकवाड, रवींद्र गुरुळे, किरण शिंदे, मंगेश काकड, शिवाजी काकड, रघुनाथ शिंदे, कैलास काकड यांच्यासह शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

कृषी विभाग विमा प्रतिनिधीच्या सावळ्या गोंधळात सहभागी 
अनेक वर्षांपासून बाभळीची झाडे उगवलेल्या शेती गटांमध्ये खरीप पिकाचे नुकसान झाल्याचा चुकीचा अहवाल विमा प्रतिनिधीने कंपनीकडे सादर केला. संबंधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यात आल्याचे तक्रारदार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावे तब्बल साठ वेळा विम्याचा लाभ देण्यात आला. ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारले, त्या संदर्भात कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. कृषी विभागाचे अधिकारी देखील विमा प्रतिनिधीच्या सावळ्या गोंधळात सहभागी आहेत.

तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून देखील समाधानकारक माहिती दिली गेली नाही. शेतकऱ्यांनी ओरड केल्यानंतर गेल्या आठवड्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संबंधित विमा प्रतिनिधीने याद्या केल्या. वास्तविक या याद्या गेल्या डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध करणे आवश्यक होते, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले आहे.


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...