Agriculture news in marathi Only five minutes of CM's dialogue in Shirol | Page 2 ||| Agrowon

शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच मिनिटांचा संवाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

पूरस्थितीचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ चार ते पाच मिनिटांचा संवाद साधत पूरग्रस्तांची निराशा केली.

शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ चार ते पाच मिनिटांचा संवाद साधत पूरग्रस्तांची निराशा केली. पद्माराजे विद्यालयात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजल्यापासून जमलेल्या पूरग्रस्तांकडून केवळ चार ते पाच मिनिटांत माहिती घेतली. त्यानंतर तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले. त्यामुळे शेकडो पूरग्रस्तांची निराशा झाली.

केवळ मोजक्याच पूरग्रस्तांशी पाच मिनिटांचा संवाद साधून ते निघून गेले. गावांनी पुनर्वसनाचा ठराव करून द्यावा शासन तो मंजूर करेल, असे आश्वासन दिले, दर वर्षी असे तात्पुरते स्थलांतर करणे आणि आम्ही तुम्हाला भेटणे, असे अपेक्षित नसल्याचे सांगत ठाकरे यांनी संवाद थांबविला आणि कोल्हापूरकडे प्रयाण केले. अनेक पूरग्रस्तांच्या बरोबरच काही संस्थाचे प्रतिनिधीही पूर येण्याची नेमकी कारणे व ठोस उपाय या बाबत मुख्यमंत्र्यांशी काहीकाळ चर्चा करण्यास उत्सुक होते, परंतु मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याबरोबर बरोबर असणाऱ्या शेकडो पोलिसांचा व अनेक कार्यकर्त्यांचा भरणा असल्याने मूळ मुद्द्यावर चर्चा झालीच नाही.

अनेक पूरग्रस्त काहीतरी सांगण्याच्या मानसिकतेत होते, त्यांना व्यथा मांडायच्या होत्या, परंतु पोलिसांची ढकलाढकली व व प्रोटोकॉलच्या प्रभावामुळे मुख्यमंत्र्याशी संवाद होऊ शकला नाही. ही भेट म्हणजे केवळ एक इव्हेंट बनला. पूरग्रस्तांची संवाद साधताना माईकची सोय करण्याची तसदीही प्रशासनाने घेतली नाही. गोंधळात त्यांचा संवाद ही लोकांना समजला नाही. केवळ एक दोन प्रश्न विचारण्यासाठी मुख्यमंत्री येथे आले होते का? असा संतप्त सवाल पूरग्रस्तांनी केला.


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...