छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू शकेल ः अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्‍वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर गुरुवारी (ता. ७) आयकर विभागाने विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई केली.
Only the Income Tax Department can tell about the purpose of the raid: Ajit Pawar
Only the Income Tax Department can tell about the purpose of the raid: Ajit Pawar

मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्‍वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर गुरुवारी (ता. ७) आयकर विभागाने विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, ‘‘छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही. आयकर खात्याला शंका असेल, तर ते छापेमारी करू शकतात. माझ्याशी संबंधित काही कंपन्यांवर छापेमारी झाली. मी स्वत: राज्याचा अर्थमंत्री आहे. त्यामुळे मी माझ्याशी संबंधित कंपन्यांचा नियमितपणे टॅक्स भरतो. राजकीय हेतूने इनकम टॅक्सने छापा मारला, की त्यामागे आणखी काही हेतू होता, ते इनकम टॅक्सचं सांगू शकते.’’

‘‘मी पण एक नागरिक आहे. माझ्या बहिणींची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झाली. त्या त्यांच्या घरी चांगला संसार करत आहेत. माझ्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवर धाडी टाकल्या. त्यामागचं कारण समजू शकलेलं नाही. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर कुठल्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातोय. याचा जनतेने विचार करावा. बाकीच्या संस्थांवर धाडी टाकल्या त्यावर काही म्हणणं नाही. पण ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावरही छापेमारी झाली, त्याचंच वाईट वाटतं. इतक्या खाल्ल्याच्या पातळीवर जाऊन कोण कसं राजकरण करू शकतं, ते मला कळलेलं नाही,’’ असंही पवार म्हणाले.

आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षड्‌यंत्र आहे. भाजपने राष्ट्रवादीचा इतका धसका का घेतलाय? आमचा कायद्यावर विश्‍वास आहे. छगन भुजबळ यांना असाच त्रास दिला. पण न्यायालयाने त्यांना न्याय दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गैरव्यवहार केलेला नाही. त्यांना बदनाम करणं एवढाच हेतू आहे. धाड घालून सनसनाटी निर्माण करणे एवढाच उद्देश आहे. - जयंत पाटील, जलसंपदा मंत्री

राज्यात किंवा जिथे जिथे भाजपविरोधी सरकार निर्माण झाले आहे, त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्‍चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. - नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com