Agriculture news in Marathi Only the Income Tax Department can tell about the purpose of the raid: Ajit Pawar | Page 2 ||| Agrowon

छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू शकेल ः अजित पवार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्‍वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर गुरुवारी (ता. ७) आयकर विभागाने विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई केली.

मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्‍वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर गुरुवारी (ता. ७) आयकर विभागाने विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, ‘‘छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही. आयकर खात्याला शंका असेल, तर ते छापेमारी करू शकतात. माझ्याशी संबंधित काही कंपन्यांवर छापेमारी झाली. मी स्वत: राज्याचा अर्थमंत्री आहे. त्यामुळे मी माझ्याशी संबंधित कंपन्यांचा नियमितपणे टॅक्स भरतो. राजकीय हेतूने इनकम टॅक्सने छापा मारला, की त्यामागे आणखी काही हेतू होता, ते इनकम टॅक्सचं सांगू शकते.’’

‘‘मी पण एक नागरिक आहे. माझ्या बहिणींची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झाली. त्या त्यांच्या घरी चांगला संसार करत आहेत. माझ्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवर धाडी टाकल्या. त्यामागचं कारण समजू शकलेलं नाही. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर कुठल्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातोय. याचा जनतेने विचार करावा. बाकीच्या संस्थांवर धाडी टाकल्या त्यावर काही म्हणणं नाही. पण ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावरही छापेमारी झाली, त्याचंच वाईट वाटतं. इतक्या खाल्ल्याच्या पातळीवर जाऊन कोण कसं राजकरण करू शकतं, ते मला कळलेलं नाही,’’ असंही पवार म्हणाले.

आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षड्‌यंत्र आहे. भाजपने राष्ट्रवादीचा इतका धसका का घेतलाय? आमचा कायद्यावर विश्‍वास आहे. छगन भुजबळ यांना असाच त्रास दिला. पण न्यायालयाने त्यांना न्याय दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गैरव्यवहार केलेला नाही. त्यांना बदनाम करणं एवढाच हेतू आहे. धाड घालून सनसनाटी निर्माण करणे एवढाच उद्देश आहे.
- जयंत पाटील, जलसंपदा मंत्री

राज्यात किंवा जिथे जिथे भाजपविरोधी सरकार निर्माण झाले आहे, त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्‍चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे.
- नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते


इतर ताज्या घडामोडी
मुंबई विमानतळावरून होणार दैनंदिन ६६०...मुंबई : कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने...
बैलगाडा शर्यतप्रकरणी सोमवारी सुनावणी राजगुरुनगर, जि. पुणे : बैलगाडा शर्यत बंदीविरोधात...
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली...मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा,...
वऱ्हाडात आता विधान परिषद निवडणुकीचा बार अकोला : विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक...
सांगलीत एकावन्न हजार शेतकऱ्यांना १४...सांगली : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत...
उस्मानाबाद जिल्ह्यात पीकविम्यावरून...उस्मानाबाद : जिल्हा प्रशासन व पीकविमा कंपनीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव सुरूनाशिक : जिल्ह्यातील बाजार समिऱ्यांमध्ये कांदा...
रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५०...रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील...
शेतकऱ्यांनो, ऊसतोडी घेऊ नका : पाटीलकऱ्हाड, जि. सातारा : साखर कारखान्यांनी एकरकमी...
जळगावात महाविकासच्या ‘सहकार’ला...जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीतून भारतीय जनता...
कापसाला यंदा दर; मात्र उत्पादकतेत मोठी...अकोला : कापसाचा दर वाढल्याने बाजारपेठेत उत्साही...
विठोबा शेतकरी गटाकडून सेंद्रिय...नांदेड : कोरोनाच्या काळात सेंद्रिय पद्धतीने...
अमरावती विभागात १२८९ गावांची पैसेवारी...अमरावती : या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व...
सरकार आणि साखर कारखानदारांना विरोधात...परभणी : मराठवाड्यातील अनेक कारखान्यांनी यंदा अजून...
सांगली जिल्हा बँक निवडणूक : अठरा...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी तीन...
शेतकऱ्यांचे ८० लाख रुपये घेऊन...गोवर्धन, जि. नाशिक : गिरणारे येथील एका...
राज्यात दुधाच्या गुणवत्तेबाबत तडजोड...संगमनेर, जि. नगर : राज्यात दुधाच्या शुद्धतेबाबत...
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा...जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीवर...
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या...
निर्यातक्षम फळनिर्मितीतूनच शेतकऱ्यांची...नागपूर : शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता...