agriculture news in Marathi, only licence holder will permission for trade, Maharashtra | Agrowon

परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी करावी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४ जानेवारीपासून नवती केळीचे दर रोज जाहीर करणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात फक्त परवानाधारक व्यापारीच केळीची खरेदी करू शकतील. जे दर जाहीर होतील, त्याच दरात खरेदी बंधनकारक राहील, फक्त मागणी अत्यल्प असली तरच जाहीर दरापेक्षा १०० रुपये कमी दरात व्यापारी खरेदी करू शकतील, असे निर्णय चोपडा बाजार समितीचे पदाधिकारी, शेतकरी व व्यापारी आदींनी एका बैठकीत नुकतेच घेतले आहेत. 

जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४ जानेवारीपासून नवती केळीचे दर रोज जाहीर करणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात फक्त परवानाधारक व्यापारीच केळीची खरेदी करू शकतील. जे दर जाहीर होतील, त्याच दरात खरेदी बंधनकारक राहील, फक्त मागणी अत्यल्प असली तरच जाहीर दरापेक्षा १०० रुपये कमी दरात व्यापारी खरेदी करू शकतील, असे निर्णय चोपडा बाजार समितीचे पदाधिकारी, शेतकरी व व्यापारी आदींनी एका बैठकीत नुकतेच घेतले आहेत. 

बाजार समितीच्या सभागृहात यासंबंधीची बैठक झाली. सभापती जगन्नाथ पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील, संचालक अरुण पाटील, धनंजय पाटील, रामलाल कंखरे, नितीन पाटील, मगन बाविस्कर, सचिव एम. बी. महाजन, शेतकरी ॲड. रवींद्र निकम, ॲड. हेमचंद्र पाटील, भागवत महाजन, सुनील पाटील, संदीप महाजन, अजित पाटील, व्यापारी संजय शर्मा, राजीव पाटील, वसंत पवार, फरीद बागवान, हाजी हारून, हाजी सत्तार, असलम खान आदी उपस्थित होते. 

केळी दरांबाबतचे राजकारण दूर करा. जानेवारी, फेब्रुवारीत केळीला मागणी असते; परंतु याच महिन्यात चोपडा बाजार समितीचे केळीचे स्वतंत्र दर नसतात. रावेरात केळी दरांबाबत राजकारण सुरू आहे, असा दावा शेतकऱ्यांनी केला. चोपडा बाजार समिती नवती केळीचे दर जाहीर करीत नाही. रावेर बाजार समिती जे दर जाहीर करते, त्यानुसार चोपड्यात खरेदी केली जाते का?

शेतकऱ्यांची दर्जेदार केळीदेखील जाहीर दरांच्या तुलनेत कमी दरात खरेदी केली जाते. व्यापाऱ्यांची मिलीभगत असते, असा आरोप सभापती पाटील यांनी केला. व्यापारी मनमानी करीत असल्याने बाजार समितीला बैठका घ्याव्या लागत आहेत. जे दर जाहीर होतात, त्यानुसार खरेदी व्यापारी करीत नाहीत. जे नियम ठरतात, त्यातही पळवाटा काढतात, असा संताप शेतकरी ॲड. रवींद्र निकम यांनी व्यक्त केला. 

केळी खरेदीनंतर जे धनादेश शेतकऱ्यांना व्यापारी देतात, त्यासंदर्भातही शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची हमी राहील, संरक्षण राहील. यासंदर्भात बाजार समिती हस्तक्षेप करून गडबड झाली तर कारवाई करील. तसेच केळी वाहतुकीचे जे मजुरी दर ठरतील, त्याबाबत शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतले जाईल, असाही निर्णय घेण्यात आला. या हंगामात जानेवारी महिना संपून मार्च सुरू झाल्याने आता मार्चपासून नवती केळीचे दर जाहीर होतील, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.


इतर अॅग्रो विशेष
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...