अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
बातम्या
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा बॅंक राखीव आहे का : हेरंब कुलकर्णी
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा बॅंक राखीव आहे का, असा सवाल अकोले (जि. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.
नगर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार वा त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सदस्यही नगर जिल्हा बॅंकेचे संचालक झाले आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबाभोवती सत्ता फिरत राहिल्याने, जिल्ह्यात राजकीय सरंजामदारी वाढते आहे. राजकीय नेतृत्व गरीब, बहुजन कुटुंबातून पुढे येत नाही. आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा बॅंक राखीव आहे का, असा सवाल अकोले (जि. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.
नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत २१ पैकी १३ संचालक हे आमदार, माजी आमदार किंवा आमदारांच्या कुटुंबीयांपैकी आहेत. म्हणजे ६२ टक्के प्रतिनिधी आमदारांच्या कुटुंबांतून आले आहेत. त्यामुळे ही बॅंक आमदारांच्या कुटुंबीयांसाठी राखीव आहे का, असा प्रश्न पडतो.
सहकाराला गती देताना, तळागाळातल्या माणसांचे आर्थिक सक्षमीकरण व त्याच वेळी सामान्य कुटुंबीयांतील नेतृत्व पुढे यावे, असा विचार होता. त्यातून सत्तेचे विकेंद्रीकरण होईल, या दृष्टीने राजकीय नेतृत्व घडविणारी ही कार्यशाळा आहे; पण सहकारी साखर कारखाने व जिल्हा बॅंकांतील राजकारण पाहता, हा हेतू पूर्णपणे फसला आहे. खरे तर आमदार कुटुंबीयांना राज्यस्तरावर नेतृत्वाची संधी मिळते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कारखाने व बॅंकांमधून पुढे आणायला हवे. त्यातून जिल्ह्यात नेतृत्वाची दुसरी व तिसरी फळी निर्माण होऊ शकेल. मात्र, तसे झाले नाही, होतही नाही.’’
- 1 of 1537
- ››