Agriculture News in Marathi Only Rs. 30 lakhs for repair of irrigation projects in Akola | Page 2 ||| Agrowon

अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी केवळ ३० लाख रुपये

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

अकोला जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी निश्‍चित करण्यात आल्याने सरकारला खरोखरच प्रकल्पांवरील पाणी व्यवस्थापन बाजू सक्षम करायची आहे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी निश्‍चित करण्यात आल्याने सरकारला खरोखरच प्रकल्पांवरील पाणी व्यवस्थापन बाजू सक्षम करायची आहे काय, असा प्रश्‍न पाणी वापर संस्थेच्या जिल्हा महासंघाच्या वतीने काटेपूर्णा प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे यांनी उपस्थित केला आहे. 

अधीक्षक अभियंता श्री. राठी,  कार्यकारी अभियंता अमोल वासुलकर यांच्यासमोर त्यांनी ही बाब स्पष्टपणे मांडली. त्यानंतर अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व बोरगाव मंजू येथील उपविभागीय कार्यालयाचे अभियंता विशाल कुलकर्णी, तसेच शाखा अभियंता नीलेश घारे व दशरथ उगले यांच्यासह काटेपूर्णा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यापासून तर बीबीसी व अन्वी झिरो या वितरिका कालव्यावरून, बोरगाव मंजू शाखेअंतर्गत येणाऱ्या अकरा पाणीवापर संस्था व पळसो शाखेअंतर्गत येणाऱ्या २१ पाणी वापर संस्था आणि आठ वितरित स्तरीय पाणी वापर संस्था व एक प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचा दौरा केला.

प्रकल्पावरील प्रत्येक कालव्याची वास्तव परिस्थिती दाखवून सुद्धा अकोला विभागाकडून ३० लाख रुपयांतून फक्त तीन लाख रुपये देखभाल दुरुस्तीकरिता काटेपूर्णा प्रकल्पासाठी तरतूद मंजूर होत असेल, तर खऱ्या अर्थाने सरकारला पाणी वापर संस्था चालवायच्या आहेत काय? आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचन व्यवस्थापन करणे महत्त्वाचे वाटते काय, अशीही विचारणा त्यांनी केली आहे. 

इतक्या कमी निधीत ४१ पाणी वापर संस्थांचे देखभाल दुरुस्तीचे काम व स्तर दुरुस्ती शक्य नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी आम्ही यावर काहीच करू शकत नाही. आम्ही फक्त प्रयत्न करू शकतो, ही सरकारची तरतूद आहे असे सांगितल्याचे श्री. तायडे यांनी म्हटले आहे. सिंचन कायदा करताना टेल-टू-हेड ही महत्त्वाची संकल्पना मांडली होती आणि पाणी व्यवस्थापनाचे ब्रीदसुद्धा शेतकरी सहभागातून ‘टेल-टू- हेड’ पाणी व्यवस्थापन राहील, असे कायदा करताना सांगितले होते. 

कालव्याची देखभाल दुरुस्ती, कालव्याची निगा राखणे, अतिवृष्टीमुळे कालव्याचे झालेले नुकसान, कालव्यावर वाढलेले गवत व असंख्य वनस्पती, पुरामुळे वाहत आलेला गाळ, फुटलेली कालव्यावरील टेक्चर, कालव्यांचे संपूर्ण रस्ते पूर्णतः नादुरुस्त आहेत. याचा विचार सरकार व पाटबंधारे विभागाने गांभिर्याने करण्याची गरज आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...