उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच; दमदार पावसाची प्रतिक्षा

उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने उजनी धरणातील उपयुक्त साठ्याची पाणीपातळी गेल्या महिनाभरापासून ६४ टक्क्यांवर स्थिर आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने उजनी धरणातील उपयुक्त साठ्याची पाणीपातळी गेल्या महिनाभरापासून  ६४ टक्क्यांवर स्थिर आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच शंभर टक्के भरलेले धऱण, यंदा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जैसे थे स्थितीत आहे. त्यातच आता पावसाचे दिवसही मोजकेच शिल्लक असल्याने धऱण कधी भरणार, याबाबत जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे. सध्या उजनीत ६४.१५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला असून, दौंड येथून ६ हजार ३४ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे. यंदाच्या वर्षी उजनी धरणात गेल्या महिन्यात सहा ऑगस्ट रोजी उजनी ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा गेला होता. गेल्या महिनाभर भीमा खोऱ्यात म्हणावा तसा पाऊस नसल्यामुळे दौंड येथील विसर्गात अपेक्षित वाढ झाली नाही. गेल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात पाच हजार क्युसेक येणारे पाणी दोन ते तीन हजार क्युसेक विसर्ग चालू राहिल्याने धरणाची उपयुक्त साठ्याची पाणीपातळी किमान ६० ते ६४ टक्क्यांपर्यंत राहिली. पाऊस नसता, तर तीही राहिली नसती. गेल्या वर्षी २४ ऑगस्टला उजनी धरण शंभर टक्के भरले होते. यंदा सप्टेंबरचा दुसरा आठवडा आला, तरी दमदार पाऊस नसल्याने धऱणातील पाणीपातळी अद्यापही वाढू शकलेली नाही. पाण्याची आवक-जावक कमीच उजनी धरणात सध्या एकूण पाणीपातळी ४९५.८५ मीटर आहे. तर धरणातील एकूण पाणीसाठा ९८.०३ टीएमसी तर त्यापैकी उपयुक्त साठा ३४.३७ टीएमसी इतका आहे. तर पाण्याची टक्केवारी ६४.१५ टक्क्यांपर्यंत आहे. सध्या दौंडकडून ६ हजार ३४ क्युसेक पाणी धरणात येत आहे. तर धरणातून पुढे सीना-माढा योजनेसाठी ७४ क्युसेक, दहिगाव योजनेसाठी ८४ क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com