agriculture news in marathi Only Sixty four percent useful reserves in Ujani dam | Page 2 ||| Agrowon

उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच; दमदार पावसाची प्रतिक्षा

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 सप्टेंबर 2021

उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने उजनी धरणातील उपयुक्त साठ्याची पाणीपातळी गेल्या महिनाभरापासून  ६४ टक्क्यांवर स्थिर आहे.

सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने उजनी धरणातील उपयुक्त साठ्याची पाणीपातळी गेल्या महिनाभरापासून  ६४ टक्क्यांवर स्थिर आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच शंभर टक्के भरलेले धऱण, यंदा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जैसे थे स्थितीत आहे. त्यातच आता पावसाचे दिवसही मोजकेच शिल्लक असल्याने धऱण कधी भरणार, याबाबत जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे.

सध्या उजनीत ६४.१५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला असून, दौंड येथून ६ हजार ३४ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे. यंदाच्या वर्षी उजनी धरणात गेल्या महिन्यात सहा ऑगस्ट रोजी उजनी ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा गेला होता. गेल्या महिनाभर भीमा खोऱ्यात म्हणावा तसा पाऊस नसल्यामुळे दौंड येथील विसर्गात अपेक्षित वाढ झाली नाही.

गेल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात पाच हजार क्युसेक येणारे पाणी दोन ते तीन हजार क्युसेक विसर्ग चालू राहिल्याने धरणाची उपयुक्त साठ्याची पाणीपातळी किमान ६० ते ६४ टक्क्यांपर्यंत राहिली. पाऊस नसता, तर तीही राहिली नसती. गेल्या वर्षी २४ ऑगस्टला उजनी धरण शंभर टक्के भरले होते. यंदा सप्टेंबरचा दुसरा आठवडा आला, तरी दमदार पाऊस नसल्याने धऱणातील पाणीपातळी अद्यापही वाढू शकलेली नाही.

पाण्याची आवक-जावक कमीच
उजनी धरणात सध्या एकूण पाणीपातळी ४९५.८५ मीटर आहे. तर धरणातील एकूण पाणीसाठा ९८.०३ टीएमसी तर त्यापैकी उपयुक्त साठा ३४.३७ टीएमसी इतका आहे. तर पाण्याची टक्केवारी ६४.१५ टक्क्यांपर्यंत आहे. सध्या दौंडकडून ६ हजार ३४ क्युसेक पाणी धरणात येत आहे. तर धरणातून पुढे सीना-माढा योजनेसाठी ७४ क्युसेक, दहिगाव योजनेसाठी ८४ क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...