कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात खरिपात केवळ ३१ टक्केच कर्जपुरवठा
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी केवळ ३१.३३ टक्केच कर्जपुरवठा बॅंकांनी केला. त्यामुळे आता रब्बीसाठी मिळालेल्या उद्दिष्टाची पूर्ती करण्यात बॅंका स्वारस्य दाखवितील की नाही, हा प्रश्नच आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी केवळ ३१.३३ टक्केच कर्जपुरवठा बॅंकांनी केला. त्यामुळे आता रब्बीसाठी मिळालेल्या उद्दिष्टाची पूर्ती करण्यात बॅंका स्वारस्य दाखवितील की नाही, हा प्रश्नच आहे.
या चार जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंकांना खरीप हंगाम २०१९-२० साठी ४९११ कोटी ३३ लाख रूपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याचा पाठलाग करणाऱ्या बॅंकांनी चारही जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार ९५६ सभासदांना १५३८ कोटी ५७ लाख ९६ हजाराचे कर्जवाटप केले. केवळ ३१.३३ टक्केच उद्दिष्टपूर्ती केली.
चारही जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना मिळालेल्या ८२२ कोटी १२ लाख २३ हजार रुपये कर्जपुरवठ्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत १ लाख २७ हजार २८८ शेतकऱ्यांना ३४६ कोटी ३२ लाख ५० हजार रूपयांचे कर्जवाटप केले. ४२.१३ टक्के उद्दिष्ट गाठले. ग्रामीण बॅंकेला ६५६ कोटी २७ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र ४५२६३ सभासदांना ३२१ कोटी १७ लाख ८ हजार रुपयांचा कर्जपुरवठा करून सर्वाधिक ४८.९४ टक्के उद्दिष्ट पूर्ती केली.
सर्वाधिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट मिळालेल्या व्यापारी बॅंकेने ३४३२ कोटी ९३ लाख रुपयांपैकी केवळ ७३४०५ सभासदांना ८७१ कोटी ८ लाख ३८ हजार रूपयांचा कर्जपूरवठा केला. केवळ २५.३७ टक्केज उद्दिष्टपूर्ती केली. हिंगोली जिल्ह्यात लक्षांकाच्या सर्वात कमी केवळ १६.५५ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त ४७.७७ टक्के कर्जपुरवठा करण्यात आला. जालना जिल्ह्यात ४१.०८ टक्के, परभणी जिल्ह्यात २२.२९ टक्के कर्जपुरवठा विविध बॅंकांनी केला.
बॅंकांना रब्बी हंगामसाठी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ६४८० कोटी ३४ लाख कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट आहे. बहुतांश पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाही. रब्बीत तरी बॅंका शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.
रब्बीसाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट (रुपये)
औरंगाबाद | १७६० कोटी |
जालना | १४९९ कोटी ९८ लाख |
परभणी | १७८३ कोटी ९१ लाख |
हिंगोली | १४३६ कोटी ४५ लाख |
रब्बीसाठी बॅंकनिहाय उद्दिष्ट
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका | ११५५ कोटी ९२ लाख |
व्यापारी बॅंका | ४४६९ कोटी ३९ लाख |
ग्रामीण बॅंक | ८५५ कोटी ३ लाख |
- 1 of 586
- ››