Agriculture news in marathi, only supply about 31% loan in Kharif in Aurangabad, Jalna, Parbhani and Hingoli district | Page 2 ||| Agrowon

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात खरिपात केवळ ३१ टक्‍केच कर्जपुरवठा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी केवळ ३१.३३ टक्‍केच कर्जपुरवठा बॅंकांनी केला. त्यामुळे आता रब्बीसाठी मिळालेल्या उद्दिष्टाची पूर्ती करण्यात बॅंका स्वारस्य दाखवितील की नाही, हा प्रश्‍नच आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी केवळ ३१.३३ टक्‍केच कर्जपुरवठा बॅंकांनी केला. त्यामुळे आता रब्बीसाठी मिळालेल्या उद्दिष्टाची पूर्ती करण्यात बॅंका स्वारस्य दाखवितील की नाही, हा प्रश्‍नच आहे. 

या चार जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंकांना खरीप हंगाम २०१९-२० साठी ४९११ कोटी ३३ लाख रूपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याचा पाठलाग करणाऱ्या बॅंकांनी चारही जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार ९५६ सभासदांना १५३८ कोटी ५७ लाख ९६ हजाराचे कर्जवाटप केले. केवळ ३१.३३ टक्‍केच उद्दिष्टपूर्ती केली. 

चारही जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना मिळालेल्या ८२२ कोटी १२ लाख २३ हजार रुपये कर्जपुरवठ्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत १ लाख २७ हजार २८८ शेतकऱ्यांना ३४६ कोटी ३२ लाख ५० हजार रूपयांचे कर्जवाटप केले. ४२.१३ टक्‍के उद्दिष्ट गाठले. ग्रामीण बॅंकेला ६५६ कोटी २७ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र  ४५२६३ सभासदांना ३२१ कोटी १७ लाख ८ हजार रुपयांचा कर्जपुरवठा करून सर्वाधिक ४८.९४ टक्‍के उद्दिष्ट पूर्ती केली.

सर्वाधिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट मिळालेल्या व्यापारी बॅंकेने ३४३२ कोटी ९३ लाख रुपयांपैकी केवळ ७३४०५ सभासदांना ८७१ कोटी ८ लाख ३८ हजार रूपयांचा कर्जपूरवठा केला. केवळ २५.३७ टक्‍केज उद्दिष्टपूर्ती केली. हिंगोली जिल्ह्यात लक्षांकाच्या सर्वात कमी केवळ १६.५५ टक्‍के, तर औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त ४७.७७ टक्‍के कर्जपुरवठा करण्यात आला. जालना जिल्ह्यात ४१.०८ टक्‍के, परभणी जिल्ह्यात २२.२९ टक्‍के कर्जपुरवठा विविध बॅंकांनी केला. 

बॅंकांना रब्बी हंगामसाठी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ६४८० कोटी ३४ लाख कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट आहे. बहुतांश पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाही. रब्बीत तरी बॅंका शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. 

रब्बीसाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट (रुपये)

औरंगाबाद १७६० कोटी 
जालना १४९९ कोटी ९८ लाख 
परभणी  १७८३ कोटी ९१ लाख
हिंगोली १४३६ कोटी ४५ लाख 

रब्बीसाठी बॅंकनिहाय उद्दिष्ट 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका  ११५५ कोटी ९२ लाख
व्यापारी बॅंका ४४६९ कोटी ३९ लाख
ग्रामीण बॅंक ८५५ कोटी ३ लाख

 


इतर ताज्या घडामोडी
वीजबिल माफ करा, अन्यथा असहकार आंदोलन ः...बुलडाणा ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे...
बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊसअकोला ः गेल्या २४ तासांपासून वऱ्हाडात पावसाची झड...
नांदुरा तालुक्यातील ‘त्या’ कृषी...बुलडाणा ः या हंगामात चार शेतकऱ्यांच्या नावावर...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची...रत्नागिरी ः संततधार पावसाने सोमवारी (ता. १०)...
उडीद पिकावर किडींचा हल्लाबोलरोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : जिल्ह्यात सततच्या...
कीटकनाशकांवरील बंदीचे लिंबूवर्गीय...लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व...
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक...वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...