धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक हजार रुपये वाढ

धान उत्पादकता खर्चात तीनपट वाढ झाली असताना गेल्या ११ वर्षांत हमीभावात मात्र केवळ एक हजार अठरा रुपयांची वाढ झाली आहे.
paddy
paddy

भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ, मजुरांची टंचाई या सर्व बाबींचा धान उत्पन्नावर परिणाम झाला आहे. धान उत्पादकता खर्चात तीनपट वाढ झाली असताना गेल्या ११ वर्षांत हमीभावात मात्र केवळ एक हजार अठरा रुपयांची वाढ झाली आहे.  धानाचे कोठार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. सुमारे एक लाख ७५ हजार हेक्‍टरवर या जिल्ह्यात  धानाची लागवड होते. खरीप आणि रब्‍बी हंगामात धान लागवडीवर शेतकऱ्यांचा भर राहतो. मात्र अलीकडे उत्पादकता खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद जुळत नसल्याने धान उत्पादकांसमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या अकरा वर्षांत धानाच्या हमीभावात केवळ १०१८ रुपयांची अल्पवाढ नोंदविण्यात आली आहे. २००८-०९ मध्ये ‘अ’ ग्रेडच्या धानाला ८८० रुपये तर साधारण धानाला ८५० रुपये दर होता. आता २०२०-२१ मध्ये ‘अ’ ग्रेड धानाला १८८८ तर साधारण धानाला १८६८ रुपये जाहीर झाला आहे.यातून उत्पादन खर्चाची भरपाई देखील शक्य नाही. एकरी १८ ते २० हजार रुपये खर्च येत असून त्या तुलनेत उत्पन्न कमी होत आहे. ही तफावत दूर करण्याची मागणी धान उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

वर्ष 'अ’ ग्रेड   सर्वसाधारण
२००८-०९ ८८० ८५०
२००९-१० ९८० ९५०
२०१०-११ १११०   १०८०
२०११-१२ १११०       १०८०
२०१२-१३ १२८०   १२५०
२०१३-१४ १३४५   १३१०
२०१४-१५   १४००   १३६०
२०१५-१६ १४५० १४१०
२०१६-१७ १५१०   १४७०
२०१७-१८ १५९०  १५५०
२०१८-१९ १७७०    १७५०
२०१९-२० १८१५   १८३५
२०२०-२१ १८८८   १८६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com