भंडाऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून केवळ तीन टक्के पीककर्ज वितरण

राष्ट्रीयीकृत बँकांनी पीककर्जासाठी हात आखडता घेतल्याने जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच पीक कर्जाचे वितरण होऊ शकले. जिल्हा बँकेने मात्र ७५ टक्के पीककर्ज वाटप करून आघाडी घेतली आहे.
Only three per cent peak loan disbursement from nationalized banks in reserves
Only three per cent peak loan disbursement from nationalized banks in reserves

भंडारा : कोरोना काळातही शेतकऱ्यांची खरिपाची लगबग सुरू असतानाच त्यांच्यावर याच काळात कर्जासाठी उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी पीककर्जासाठी हात आखडता घेतल्याने जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच पीक कर्जाचे वितरण होऊ शकले. जिल्हा बँकेने मात्र ७५ टक्के पीककर्ज वाटप करून आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयीकृत बँकाच्या धोरणामुळे मात्र शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारी जाण्याची वेळ आली आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत खासगी आणि जिल्हा बँकांना ४६५ कोटी रुपयांची पीककर्जाचे उद्दिष्ट होते. १५ एप्रिलपासून कर्ज वितरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ४१ हजार १११ शेतकऱ्यांना २३० कोटी १ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्ज वितरण झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा बँकेने केले असून त्याची टक्केवारी ७५ आहे. जिल्हा बँकेला २८० कोटी ७८ लाख रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार बँकेने ३९ हजार ४६७ शेतकऱ्यांना २०९ कोटीचे वितरण  केले आहे. विदर्भ कोकण बँकेला ३६ कोटी ७५ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. १०३१ शेतकऱ्यांना ८० कोटी एक लाख म्हणजे २२ टक्के कर्ज वितरण बँकेकडून करण्यात आले. जिल्ह्यातील खासगी बँकांना १९ कोटी ३८ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. त्यांनी १२५ शेतकऱ्यांना १ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. उद्दिष्टाच्या १० टक्के कर्ज वितरित झाले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना दरवर्षी नकारात्मक अनुभव येतो आणि वेळेपर्यंत हे कर्ज दिले जात नाही यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांना १२८ कोटी ९ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या बँकांनी ४८८ शेतकऱ्यांना ३६ कोटी ६३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले. उद्दिष्टाच्या केवळ तीन टक्केच वितरण करण्यात आले आहे.

सात बँकांकडून अद्याप सुरुवात नाही जिल्ह्यात २२ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. त्यापैकी ११ बँकांना पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यापैकी केवळ बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेने कर्ज वितरित केले आहे. इतर सात बँक यांनी अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला कर्जाचे वितरण केले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com