Agriculture News in Marathi Only when the price of onion goes up Why are raids dropped? | Page 2 ||| Agrowon

कांद्याचे भाव वाढल्यावरच  का पाडले जातात छापे? : माजी आमदार मारोतराव पवार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

उन्हाळ कांद्याचे भाव वाढून शेतकऱ्यांना दोन रुपये मिळू लागले की पिंपळगाव बसवंत, लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडतात.

येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव वाढून शेतकऱ्यांना दोन रुपये मिळू लागले की पिंपळगाव बसवंत, लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडतात. छापे पडले की कांदा भावात मोठी घसरण होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागत असून, ही पद्धत अयोग्य आहे. ती तातडीने थांबवावी, अशी मागणी येथील माजी आमदार मारोतराव पवार यांनी केली आहे. 

शेतकरी नेहमीच तोट्यात असतो, शेतीत गुंतवलेले भांडवल मिळणे अनेकदा त्याला कठीण होऊन जाते. या वर्षीच्या सुरुवातीला पाऊस लांबल्याने पिकांची वाढ व विकास खुंटला तर जेव्हा पिके जोमात होती. त्या वेळेस अतिवृष्टी होऊन पाण्यात पिके अक्षरशः सडली. दर वर्षीच कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना सहन करून शेतीत कोट्यवधीच्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 

यंदा टोमॅटोसह भाजीपाला मातीमोल होऊन रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीत शेतकरी फेब्रुवारी-मार्चमध्ये पिकवलेला उन्हाळ कांदा दोन रुपये मिळतील यासाठी पाच ते सहा महिने संभाळून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विक्रीला आणतो. चाळीमध्ये साठवलेल्या कांद्यातही सुमारे २५ ते ४० टक्के नुकसान होते. अनेकदा चाळीतले कांदेही सडून जातात. अशा स्थितीत मिळणारा वाढीव भाव थोडासा आधार देणारा असतो. मात्र त्यातही छापेमारी करून बाजारपेठ विस्कळीत करण्याचा प्रयत्न होत असेल, तर शेतकऱ्यांवर हा दिवसाढवळ्या होणारा अन्याय आहे. 

मागील आठवड्यात चार हजारांच्या दरम्यान कांद्याचे भाव पोहोचले असतानाच अचानक प्राप्तिकर विभागाने कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकल्याने भावात हजार ते दीड हजारापर्यंत घसरण झाली आहे. व्यवहारांच्या नियमबाह्यतेचे समर्थन करणार नाही, पण नेमकी दरवाढ झाल्यावरच का छापेमारी होते याचे उत्तर अधिकाऱ्यांनी व राज्यकर्त्यांनी देखील शेतकऱ्यांना द्यायला हवे. हा प्रकार नियमितपणे सुरू राहिल्यास शेतकरी होणाऱ्या अन्यायाविरोधात नक्कीच रस्त्यावर उतरतील. त्यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता सरकारनेच दखल घ्यावी आणि भाववाढ होते तेव्हा छापेमारीचे उभे राहिलेले नाटक थांबवावे, अशी मागणी माजी आमदार पवार यांनी केली आहे.


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...