पावसाची उघडीप, गोदेचा पूर ओसरला

पावसाची उघडीप, गोदेचा पूर ओसरला
पावसाची उघडीप, गोदेचा पूर ओसरला

नाशिक : गंगापूर धरण पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गंगापूर धरणातून सुरू असलेला एक हजार १३७ क्युसेकचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवार (ता. ११) पासून पावसाचा जोर ओसरला असून उघडीप मिळाली आहे. त्यामुळे धरणांमधून सोडण्यात येणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करून बंद करण्यात येत आहे. गंगापूर धरणात ५१२४ दशलक्ष घन फूट इतके पाणी असून ती टक्केवारी ९१ वर गेली आहे.  गेल्या रविवारी (ता. ४) पावसाचे दमदार आगमन झाल्याने जिल्ह्यात महापुराला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी व दारणा नदीच्या काठी मोठे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक व जीवितहानी झाली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणांतून केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात जलपातळीत घट झाली. त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप घेतल्याने सोमवार (ता. १२) पासून धरणाच्या विसर्गात लक्षणीय घट करण्यात आली. त्यामुळे गोदावरी नदीची पूरपरिस्थिती पूर्वपदावर आली आहे. गंगापूर वगळता जिल्ह्यातील इतर धरणांतून पाण्याचा सोडण्यात येणारा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्याकाठी पाणी कमी झाल्याने स्वच्छता या कामांना वेग आला आहे. त्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. नाशिक, निफाड तालुक्यांतील नदीच्या काठच्या काही भागांतील पाणी ओसरत असून मोकळीक होत आहे. मात्र, पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com