Agriculture news in marathi; The open Goddess, the Goddess floods | Agrowon

पावसाची उघडीप, गोदेचा पूर ओसरला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नाशिक : गंगापूर धरण पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गंगापूर धरणातून सुरू असलेला एक हजार १३७ क्युसेकचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवार (ता. ११) पासून पावसाचा जोर ओसरला असून उघडीप मिळाली आहे. त्यामुळे धरणांमधून सोडण्यात येणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करून बंद करण्यात येत आहे. गंगापूर धरणात ५१२४ दशलक्ष घन फूट इतके पाणी असून ती टक्केवारी ९१ वर गेली आहे. 

नाशिक : गंगापूर धरण पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गंगापूर धरणातून सुरू असलेला एक हजार १३७ क्युसेकचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवार (ता. ११) पासून पावसाचा जोर ओसरला असून उघडीप मिळाली आहे. त्यामुळे धरणांमधून सोडण्यात येणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करून बंद करण्यात येत आहे. गंगापूर धरणात ५१२४ दशलक्ष घन फूट इतके पाणी असून ती टक्केवारी ९१ वर गेली आहे. 

गेल्या रविवारी (ता. ४) पावसाचे दमदार आगमन झाल्याने जिल्ह्यात महापुराला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रामुख्याने गोदावरी व दारणा नदीच्या काठी मोठे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक व जीवितहानी झाली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणांतून केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात जलपातळीत घट झाली.

त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप घेतल्याने सोमवार (ता. १२) पासून धरणाच्या विसर्गात लक्षणीय घट करण्यात आली. त्यामुळे गोदावरी नदीची पूरपरिस्थिती पूर्वपदावर आली आहे. गंगापूर वगळता जिल्ह्यातील इतर धरणांतून पाण्याचा सोडण्यात येणारा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्याकाठी पाणी कमी झाल्याने स्वच्छता या कामांना वेग आला आहे. त्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. नाशिक, निफाड तालुक्यांतील नदीच्या काठच्या काही भागांतील पाणी ओसरत असून मोकळीक होत आहे. मात्र, पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. 


इतर बातम्या
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
वारणा, गोकुळ दूध संघांकडून दरात वाढकोल्हापूर : जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर...
नाशिक : अतिवृष्टीनंतर कपाशीवर करपाचा...नाशिक : अतिवृष्टीमुळे सातत्याने कपाशी लागवडीमध्ये...
कृषी संशोधन केंद्रे पांढरा हत्ती ठरू...भंडारा ः सर्वाधिक रोजगार शेतीमधून उपलब्ध होऊ शकतो...
मधमाश्या, मित्रकीटक वाचविण्यासाठी...नाशिक: मधमाश्यांची संख्या जगभरात तसेच भारतातही...
बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌...आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी...
शेतकरी संघटनेचे गुरुवारी निर्बंधमुक्ती...नगर ः संपूर्ण कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांचा...
पुणे : फळपीक विमा योजना असून नसल्यासारखीपुणे : फळपिकांना हवामानाच्या धोक्यापासून संरक्षण...
गडहिंग्लजमध्ये ज्वारीचे क्षेत्र एक हजार...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : अतिवृष्टी आणि अवकाळी...
बाजारपेठेवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब...नगर  : ‘‘कमी पाणी व जास्त पाणी, अशा दोन...
नवीन वर्षात ७५० ग्रामपंचायतींच्या...पुणे : येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या...
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...