'जलयुक्त शिवार'ची होणार खुली चौकशी

जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटींवर ‘कॅग’ने आक्षेप घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
An open inquiry will be held into 'water-rich camps'
An open inquiry will be held into 'water-rich camps'

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटींवर ‘कॅग’ने आक्षेप घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणाची खुली चौकशी होणार असून भाजपने नाराज होऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये, असा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. बुधवारी (ता. ४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेत अनेक त्रुटी असून या योजनेच्या खर्चावरही कॅगने ताशेरे ओढले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या चौकशीचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.  

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी भाजपला टोले लगावले. ‘कॅग’ने जलयुक्त शिवार योजनेच्या काही त्रुटींवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खुली चौकशी करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. या चौकशीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. या योजनेवर कॅगने ताशेरे ओढल्यानंतरही चौकशी नाही केली तर जनता आम्हाला जाब विचारेल. त्यामुळे चौकशी करणे गरजेचे आहे. ही चौकशी होत असल्याने भाजपने नाराज होऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये, असा चिमटाही त्यांनी काढला. जलयुक्त शिवाराबाबत फडणवीसांचे सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे की ‘कॅग’चे सर्टिफिकेट महत्त्वाचे आहे, असे श्री.पाटील म्हणाले.  

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल भूजल योजनेवर चर्चा सुरु असतानाच पाण्याची पातळी वाढविण्यावर चर्चा झाली. त्यात कॅगने जलयुक्त शिवार योजनेवर ओढलेल्या ताशेऱ्यांचाही विषय आला. त्यामुळे जे कायदे आहेत. त्यानुसार चौकशी होणार आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेसाठी ९ हजार कोटी रुपये वापरले होते. परंतु पाण्याची पातळी काही वाढली नाही. त्यावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे कॅगच्या अहवालाच्या आधारेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा दावा केला जात आहे. मग योजनेच्या पूर्वी दीड हजार टँकर लागत होते, आता पाच हजार टँकर का लागतात? असा सवालही पाटील यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com