Agriculture News in Marathi Open letter to Modi | Page 3 ||| Agrowon

मोदींना लिहिणार खुले पत्र

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

देशातील सुमारे ४० शेतकरी संघटनांची शिखर संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने आपले पूर्वनियोजित आंदोलन सुरूच राहील, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः देशातील सुमारे ४० शेतकरी संघटनांची शिखर संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने आपले पूर्वनियोजित आंदोलन सुरूच राहील, असे म्हटले आहे. आज (सोमवारी) होणाऱ्या बैठकीत आंदोलनाच्या नियोजनासह पुढील धोरणांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. शिवाय बैठकीतील चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले जाईल, अशी माहिती शेतकरी नेते बलबील सिंग राजेवाल यांनी दिली.

पत्रकारांना माहिती देताना राजेवाल म्हणाले, ‘‘आम्ही पंतप्रधानांना एक खुले पत्र लिहून किमान आधारभूत किंमत (हमीभाव) समिती, तिचे अधिकार, कालमर्यादा, कर्तव्ये. वीजबिल २०२० कायदा आणि शेतकऱ्यांवरील खटले मागे घेणे आणि लखमीपूर खेरी घटनेबद्दल मंत्री अजय मिश्रा टेनी यांना निलंबित करण्यासाठीच्या मागण्याचा पत्रात उल्लेख असेल. 

कायदे मागे घेण्याच्या पावलाचे आम्ही स्वागत करतो. परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी शिल्लक आहेत. संयुक्त किसान मोर्चाचे नियोजित आंदोलन सुरूत राहील. २२ नोव्हेंबरला लखनौमध्ये किसान पंचायत, २६ नोव्हेंबरला सर्व सीमांवर मेळावे आणि २९ नोव्हेंबरला संसदेकडे मोर्चा काढण्यात येईल. २७ नोव्हेंबरला संयुक्त किसान मोर्चाची आणखी एक बैठक होणार असून, या बैठकीत भविष्यातील आंदोलनाबाबत चर्चा केली जाईल.’’

हमीभाव, शहीद शेतकऱ्यांना मदतीची मागणी 
तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने किमान आधारभूत किमतीवर (हमीभाव) लक्ष केंद्रित केले आहे. हमीभावाचा कायदा करण्याची मागणी केली आहे. शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी आणि त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही मोर्चाने केली आहे.

बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत
‘माघारीवर’ शिक्कामोर्तब शक्‍य 

नवी दिल्ली ः केंद्रीय मंत्रिमंडळाची २४ रोजी बैठक होणार असून, या बैठकीत तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, असे सरकारी सूत्रांनी रविवारी सांगितले. त्यानंतर कायदे मागे घेण्याचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात सादर केली जाईल. संसदेचे अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...