Agriculture news in marathi In the open market with the trumpet Cross the guarantee stage | Agrowon

तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा टप्पा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात असली तरी खुल्या बाजारात आता तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे. नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ६ हजार ६५० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला आहे.

नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात असली तरी खुल्या बाजारात आता तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला आहे. नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ६ हजार ६५० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला आहे. सध्या नगरसह जिल्हाभरात सुमारे पाचशे क्विंटलच्या जवळपास तुरीची आवक होत आहे. खुल्या बाजारात दर वाढल्याने हमी केंद्रावरील तूर खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात यंदा ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. काही भागातील नुकसानीचा अपवाद वगळला तर यंदा चांगल्या पावसामुळे तुरीचे बंपर उत्पादन निघाले आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार साडे नऊ क्विंटल हेक्टरी उत्पादन दाखवले जात असले तरी यंदा प्रत्यक्षात हेक्टरी पंधरा क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन निघाले आहे. तूर बाजारात आल्यानंतर दर्जा चांगला नसल्याचे सांगत कमी दराने खरेदी केली जात असल्याने हमीदराने खरेदी करण्याची मागणी केली.

त्यानुसार नगर जिल्ह्यात १२ ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमधून तूर खरेदी केली जात आहे. मात्र अनेक वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच खुल्या बाजारात तुरीने हमी दराचा टप्पा ओलांडला आहे. एक महिन्यांपूर्वी साधारण पाच हजार रुपये तर पंधरा दिवसांपूर्वी साडेपाच हजारांचा तुरीला दर होता. गेल्या आठ दिवसांत त्यात वाढ होऊन सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तुरीची हमी केंद्रावर सहा हजार रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जात असली तरी खुल्या बाजारात ६ हजार ६५० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळत आहे.

खुल्या बाजारात दर वाढल्याने हमी केंद्रावरील तूर खरेदीवर परिणाम होताना दिसत आहे. तुरीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तुरीच्या दरवाढीचा मात्र तूर दाळीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तूर पिकावर दृष्टीक्षेप

  •   खरीप हंगामात ५८ हजार हेक्टरवर पेरणी
  •   हेक्टरी सुमारे पंधरा क्विंटल उत्पादन
  •   जिल्ह्यात बारा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे. हमीभाव खरेदी ६०००, तर खुल्या बाजारात ६६५० रुपये प्रति क्विंटल विक्री

इतर अॅग्रोमनी
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...
द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी...
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहीलवॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा...
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...
सोयाबीन पाच हजारांवरपुणे ः उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली...
तूर टप्प्‍याटप्प्याने विकण्याचे आवाहन पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात ३० टक्‍...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ...
शेतजमीन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...नवी दिल्ली ः शेतजमिनी भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...