agriculture news in Marathi open markets of goat and sheep Maharashtra | Agrowon

शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात ग्रामीण भागात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून आठवडी बाजारात व्यवहार होतात. यंदा मात्र ‘कोरोना’मुळे हे व्यवहार बंद आहेत.

नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात ग्रामीण भागात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून आठवडी बाजारात व्यवहार होतात. यंदा मात्र ‘कोरोना’मुळे हे व्यवहार बंद आहेत. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून हे नुकसान टाळण्यासाठी ‘कोरोना’बाबतचे सर्व नियम पाळून राज्यात शेळ्या-मेंढ्यांचे खरेदी - विक्री व्यवहार सुरु करावेत, अशी मागणी नगर जिल्हा शेळीपालन व प्रक्रिया सहकारी संघाचे अध्यक्ष अशोक काळे यांनी केली आहे. 

काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की  ग्रामीण भागामध्ये शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून शेतकरी, कष्टकरी,  कामगारांचे आर्थिक व्यवहार होतात. अनेकांचा बाजार हाटही शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीवरच अवलंबून आहे. शेळ्या मेंढ्यांच्या विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. आता १६ जुलैला आषाढी अमावस्या व १ ऑगस्टला बकरी ईद आहे. 
या काळात शेळ्या-मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

दरवर्षी याकालावधीत दरही चांगले मिळतात. महिनाभरात चार ते पाच दिवस हे बाजार भरतात. अनेक शेतकरी आषाढ महिन्यात आणि बकरी ईदच्या कालावधीत शेळ्या-मेंढ्यांची विक्री करता यावी, यासाठी अन्य काळात शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्री करत नाहीत. आता विक्री करण्याची वेळ आलेली असतानाच ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बाजार बंद असल्याने शेळ्या- मेंढ्या खरेदी-विक्री पूर्णतः बंद आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने आता ‘कोरोना’च्या अनुषंगाने अटींच्या अधीन राहून हे बाजार तातडीने सुरू करावेत, अशी मागणी श्री. काळे यांनी केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...