मुक्त विद्यापीठ ‘कृषी पदवी’वरील बंदीबाबत युजीसीकडे पाठपुरावा करणार

मुक्त विद्यापीठ ‘कृषी पदवी’वरील बंदीबाबत युजीसीकडे पाठपुरावा करणार
मुक्त विद्यापीठ ‘कृषी पदवी’वरील बंदीबाबत युजीसीकडे पाठपुरावा करणार

अकोला ः देशातील मुक्त विद्यापीठांमधून दिल्या जाणाऱ्या कृषी विषयाच्या विविध पदवी शिक्षणक्रमांवर आगामी शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठ अनुदान आयोगाने बंदी घातल्याने खळबळ उडाली आहे. विद्यापीठ आयोगाच्या या निर्णयाबाबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ लवकरच फेरविचाराबाबत पत्र व्यवहार करणार आहे. या विद्यापीठाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या अनुषंगाने चर्चा होऊन निर्णय घेण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त विद्यापीठांद्वारे दिल्या जाणाऱ्या कृषी पदवी शिक्षणक्रमांवर १५ मार्च रोजी दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात दूरस्थ शिक्षण देण्यात अग्रेसर असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून दरवर्षी हजारो विद्यार्थी दूरस्थ पद्धतीने पदव्या घेत असतात.  राज्यात मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाचा दर्जा अत्युच्च समजला जातो. ही पदवी सर्वच ठिकाणी ग्राह्य धरली जात होती. या पदव्यांबाबत तक्रारीही नव्हत्या, असे असताना अनुदान आयोगाने सरसकट निर्णय घेत दूरस्थ पद्धतीने मुक्त विद्यापीठांमधून दिल्या जाणाऱ्या कृषीविषयक पदव्यांवर येत्या सत्राबाबतून बंदी घालण्याचे जाहीर केले. त्याचे पत्र इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासह विविध राज्यांतील मुक्त विद्यापीठांना देण्यात आले आहे. राज्यात ५० पेक्षा अधिक ठिकाणी असलेल्या मुक्त विद्यापीठाचा केंद्रांमधून प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून दिले जात आहे.   

पत्रांवर पत्र ! केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने काढलेले पत्र प्राप्त होताच राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांनी पत्र काढत या निर्णयाबाबत सर्वांना अवगत केले होते. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी मुक्त विद्यापीठाचे केंद्र आहेत, अशाठिकाणी याची माहिती देण्यात आली. याला काही कालावधी जात नाही तोच मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवांनी २७ मार्चला पत्रक काढत कृषी विज्ञान विद्याशाखेच्या संचालकांनी काढलेले पत्र कुलगुरूंच्या आदेशानुसार रद्द समजावे असे सुचविले. त्यानंतर या विद्यापीठाच्या परिषदेची बैठक होऊन त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचाराबाबत पाठपुरावा करण्याचे ठरले आहे. यामुळेच आता राज्यात मुक्त विद्यापीठातून दिल्या जाणारे कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रम सुरू राहील किंवा नाही, यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com