‘जलशक्ती’साठी निधी खर्चाचा मार्ग मोकळा

‘जलशक्ती’साठी निधी खर्चाचा मार्ग मोकळा
‘जलशक्ती’साठी निधी खर्चाचा मार्ग मोकळा

जळगाव  : जलशक्तीसाठी मंजूर ७ कोटी ८९ लाखांचा निधी खर्च करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत करण्यात आला. केंद्राच्या जलशक्ती अभियानांतर्गत जलसिंचनाचे काम होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे.  जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष लालचंद पाटील, सदस्या पल्लवी सावकारे, पवन सोनवणे, प्रभाकर सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते.  जलशक्तीवर खर्च करण्यात येणारा निधी हा जिल्हा परिषदेचा आहे. काही सदस्यांनी त्याला विरोध केला होता. काम थांबविण्याबाबत ठरावदेखील करण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा नियोजनाच्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जलशक्तीचा निधी खर्च करण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे जनशक्तीचे काम हे लघू सिंचन विभागाशी निगडित असल्याने जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत जलशक्तीचा निधी खर्च करण्याबाबत ठराव करण्यात आला. भुसावळ तालुक्‍यातील साकरी येथील पांझर तलावातून उत्खनन केलेल्या मुरुमाचा वापर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणासाठी करण्यात आला आहे. पांझर तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. त्यामुळे २५ टक्के रॉयल्टी जिल्हा परिषदेच्या सेस फंडात जमा करावयाचे आहे. परंतु, दहा महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी जमा करण्यात आलेली नाही. रक्कम जमा करण्याबाबत संबंधित कंपनीला नोटिस पाठविण्यात आली होती. आठवड्याभरात रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही रॉयल्टी भरली नसल्याने सदस्या पल्लवी सावकारे यांनी जलव्यवस्थापनाच्या बैठकीत तक्रार केली. सिमेंट बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर  खासदार उन्मेष पाटील यांनी जलसंधारण महामंडळ योजनेंतर्गत सिमेंट बंधारे बांधण्यासाठी १६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. काम सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून ना-हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक होते. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ना-हरकत दाखला देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पारोळा, चाळीसगाव, पाचोरा तालुक्‍यात नदीवर सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com