Agriculture news in marathi Opened strawberry redness in tribal areas with vineyards | Agrowon

द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली स्ट्रॉबेरीची लाली

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची राज्यभर ओळख आहे. त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रात सुरगाणा, कळवण या तालुक्यांत अल्प प्रमाणावर लागवडी होऊ लागल्या आहेत. मात्र, तांत्रिक मार्गदर्शन नसल्याने यात अडचणी होत्या. यावर ओम गायत्री शेतकरी उत्पादक कंपनीने आदिवासी भागासह द्राक्षपट्ट्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामुळे द्राक्षपट्ट्यात आता स्ट्रॉबेरीची लाली पाहायला मिळत आहे. 

नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची राज्यभर ओळख आहे. त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रात सुरगाणा, कळवण या तालुक्यांत अल्प प्रमाणावर लागवडी होऊ लागल्या आहेत. मात्र, तांत्रिक मार्गदर्शन नसल्याने यात अडचणी होत्या. यावर ओम गायत्री शेतकरी उत्पादक कंपनीने आदिवासी भागासह द्राक्षपट्ट्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यामुळे द्राक्षपट्ट्यात आता स्ट्रॉबेरीची लाली पाहायला मिळत आहे. 

गेल्या काही वर्षांत नाशिक जिल्ह्यात थंडीत तापमान ५ अंश सेल्सिअस खाली जात आहे. त्यात निफाड तालुक्यात तर यापेक्षाही कमी तापमानाच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना याचा फटका बसत असल्याने एक पर्यायी पीक प्रयोग म्हणून त्यानुसार स्ट्रॉबेरी लागवडीचा निर्णय ओम गायत्री शेतकरी उत्पादक कंपनीने घेतला. लागवडीसाठी मातृवृक्ष उपलब्ध करून त्यानुसार निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे तसेच कळवण, सुरगाणासह गुजरातमधील सापुतारा भागात ४०० शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हा प्रयोग यशस्वी केला आहे.

गेल्या महिन्यापासून स्ट्रॉबेरी हंगाम सुरू झाला आहे. या फळांना चांगली चव असल्याने स्थानिक बाजारात व पर्यटकांना थेट विक्री केली जात आहे. 

पिकाचे अर्थकारण असे 
दर दिवसाआड स्ट्रॉबेरीची काढणी सुरू असून, एक तोड्यात २०० किलो उत्पादन मिळत आहे. त्यास ६० ते ७० रुपये प्रतिकिलो स्थानिक बाजारात दर मिळत आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आता नाशिकच्या स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळत आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...