देऊर शिवारात सिंगल फेज वीज वाहिनी कार्यान्वित

सिंगल फेज जोडणी गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित होती. संबंधित समस्यांचे ‘सकाळ’मध्ये सातत्याने ठळक वृत्त प्रसिद्ध झाले. या बातमीची धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दखल घेत संबंधित राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता.
Operation of single phase power line in Deor Shivara
Operation of single phase power line in Deor Shivara

देऊर, जि. धुळे ः ककाणी, म्हसदी (ता. साक्री) संलग्न शेतीशिवारात रात्री घरासाठी देण्यात येणाऱ्या सिंगल फेज जोडणी गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित होती. संबंधित समस्यांचे ‘सकाळ’मध्ये सातत्याने ठळक वृत्त प्रसिद्ध झाले. या बातमीची धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दखल घेत संबंधित राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतीशिवारात वीज पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी ‘सकाळ’चे धन्यवाद मानत आमदार श्री. पाटील यांचे आभार मानले.

धुळे ग्रामीण विभागातर्गंत ३३/११ के.व्ही. म्हसदी उपकेंद्रातून नवीन ११ के.व्ही जोडणी केलेल्या सिंगल फेजला ‘चिंतामण फिडर’ नाव देण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या दप्तरी ऑनलाइन नोंद झाली आहे. महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे, उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार, टेस्टिंगचे कार्यकारी अभियंता व्ही. एन. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतामण फिडरचे उद्घाटन कनिष्ठ अभियंता एस. के. बेंद्रे यांनी केले.

म्हसदी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता योगेश खैरनार, नेरचे कनिष्ठ अभियंता बी. व्ही. सूर्यवंशी उपस्थित होते. शेतकरी, जागल्या कुटुंबांना २४ तास वीज पुरवठा राहणार आहे. विजेमुळे शेतकऱ्यांच्या मुलांना रात्री अभ्यासासाठी मदत होणार आहे. बिबट्याचा सातत्याने होणारा त्रास कमी होणार आहे.

शेतीशिवारात रात्री विजेचा दिवा एक आधारवड आहे. सिंगल फेज वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर या शिवारातील ३५ शेतकऱ्यांनी अधिकृत वीज (कनेक्शन) जोडणी घेतली आहे. आत्तापर्यंत सिंगल फेज वीजेचे बिल येथील शेतकऱ्यांनी भरणा केला आहे. सिंगल फेज वीज जोडणीसाठी देऊर कक्षाचे वीज तंत्रज्ञ आर. एम. साळुंखे, बाह्यस्रोत कर्मचारी भाऊसाहेब घेर, भूषण देवरे यांनी विशेष परिश्रम घेत शेतीशिवारील तांत्रिक बिघाड दुरुस्त करीत वीज पुरवठा सुरळीत केला.

उर्वरित शेतकऱ्यांनी सिंगल फेज वीज जोडणी कनेक्शन घ्यावे. वीज बिल वेळेवर भरणा करावा. शेतकऱ्यांनी काही अडचण असल्यास कृपया अर्ज करावा. समस्या तत्काळ सोडविल्या जातील. महावितरण कंपनीस सहकार्य करावे. - एस. के. बेंद्रे, कनिष्ठ अभियंता महावितरण कंपनी. देऊर कक्ष, ता. धुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com