स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वॅब तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये यंदा नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित केली आहे. एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे.
Operation of Swab Testing Laboratory at Marathwada University
Operation of Swab Testing Laboratory at Marathwada University

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये यंदा नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित केली आहे. एनएबीएल (नॅशनल अॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. 

या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी बुधवारी (ता.२९) विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन त्याची पाहणी केली. आमदार अमरनाथ राजूरकर, मोहन हंबर्डे, कुलगुरू डॉ. भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ. राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. गजानन झोरे, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. दीपक शिंदे आदी उपस्थित होते. 

कोणत्याही प्रयोगशाळेसाठी एनएबीएलची मान्यता आवश्यक आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्याचा असतो. परंतु, विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेला फक्त तीन आठवड्यात ही मान्यता मिळाली. या समितीचे अध्यक्ष डॉ. भोसले, डॉ. झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रो. संजय मोरे, डॉ. सुप्रिया यमेकर, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. मनमोहन बजाज, संदीप काळे यांची त्यात प्रमुख भूमिका होती. 

शनिवारी (ता.२५) आणि रविवारी (ता.२६) ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीतर्फे करण्यात आले. त्यामुळे या दोन दिवसांत या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत. 

नांदेड येथील कोरोना संशयीत रुग्णांचे स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते. त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत होता.  दररोज येताहेत १०० नमुने 

सद्या दररोज सरासरी १०० च्या वर कोरोना स्वॅबचे नमुने हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून येत आहेत. जास्तीत जास्त २५० नमुन्याची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देता येतो. दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे कुलगुरू डॉ. भोसले यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com