Agriculture news in marathi Operation unstable in Nashik due to onion export ban | Agrowon

नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज अस्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आवकेवर मोठा परिमाण झाला आहे. याचा फटका प्रामुख्याने कांदा उत्पादकांना बसत आहे.

नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आवकेवर मोठा परिमाण झाला आहे. याचा फटका प्रामुख्याने कांदा उत्पादकांना बसत आहे. साठवलेला कांदा टप्प्याटप्प्याने विकण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. परिणामी, कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कामकाज अस्थिर झाल्याचे चित्र आहे. 

चाळीमध्ये शिल्लक असलेल्या कांद्याच्या दरात मागील सप्ताहाच्या शेवटी सुधारणा झाली होती. ३ हजारांवर काही अंशी गेलेल्या कांद्याचे दरवाढीचे चित्र रंगवले गेले. त्यातच केंद्राने निर्यातबंदीचा निर्णय घेऊन नियमित व्यापार अडचणीत आणला. त्यामुळे कमाल दराचा वास्तविक फायदा नसताना हा अधांतरी निर्णय झाल्याने उत्पादक व व्यापारी असे दोन्ही घटक अडचणीत सापडले. त्यामुळे दरात १ हजार ते ५०० रुपयांनी घसरण झाली. याच अनुषंगाने जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये होणारी कांद्याची आवक कमी होत आहे. 

निर्यातबंदीमुळे व्यवहार कमी होऊन आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी थांबले होते. निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला जाईल, याच्या ते प्रतीक्षेत आहेत. 
- बाळासाहेब बाजारे, सचिव-कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत 

कांदा मोठ्या प्रमाणावर सडू लागला आहे. निर्यातबंदीमुळे अडचण वाढली आहे. भाव नसल्याने आता टप्प्याटप्प्याने विकण्याचा निर्णय घेतला आहे. 
- दादासाहेब पाटील, कांदा उत्पादक, पाळे खुर्द, ता.कळवण

कांदा आवक स्थिती (क्विंटल)

बाजार समिती १४ सप्टेंबर  १५ सप्टेंबर १६ सप्टेंबर
पिंपळगाव बसवंत  १९२९२ २२१९२ १५४२३
लासलगाव १५३६८ ७२ ९०४४
सटाणा १६२८० ११३२० १८१६०
उमराणे १८७६७  १५१५१ १०२३२
येवला ८५१२  बंद ३०६१
सिन्नर  ८४२३  ३०९३ ४१९६
मनमाड  ४५७७  ३५२० १५००

 


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...