Agriculture news in marathi Opponents try to create confusion | Page 2 ||| Agrowon

संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न : केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

‘ शेतकरी हिताचे असलेल्या या कृषी कायद्यांच्या आडून विरोधक राजकारण करीत आहेत. देशात संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे,’ असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला.
 

अकोला  : ‘केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तीन कृषी कायदे केले. परंतु शेतकरी हिताचे असलेल्या या कृषी कायद्यांच्या आडून विरोधक राजकारण करीत आहेत. देशात संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे,’ असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला.

नवी दिल्ली येथून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यात कृषी कायदे कसे शेतकरी हिताचे आहेत, या बाबत सरकारची मांडणी केली. संजय धोत्रे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पिकाचे विविधीकरण आणि नवीन बाजारपेठेची उपलब्धता आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात इको-सिस्टम तयार करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, जिथे चांगल्या प्रतीचे सुधारित बियाणे, अस्सल खते उपलब्ध आहेत.``

आंदोलक हेका सोडण्यास तयार नाहीत
शेतकऱ्यांना वेठीस धरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासोबतच नाहक आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या पासून सावध राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार कायद्यामध्ये बदल करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, आंदोलन करणाऱ्या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत, असेही धोत्रे म्हणाले. . या संघटनांच्या नेत्यांना कृषी कायद्याच्या निमित्ताने केवळ राजकारण करायचे आहे, असे आरोपही मंत्री धोत्रे यांनी केला.

 


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...