जळगाव जिल्हा परिषदेत कामे करून घेण्यात विरोधकांची सरशी

जिल्हा परिषदेतील कामे करून घेण्यात विरोधकांची सरशी
जिल्हा परिषदेतील कामे करून घेण्यात विरोधकांची सरशी

जळगाव : भाजपमधील अंतर्गत कलहाचा लाभ विरोधक घेतात. ते सर्व पदाधिकाऱ्यांकडे जाऊन आपापली कामे मार्गी लावून घेतात. सत्तेतील सदस्यांची कामे मात्र रखडतात. त्यांना भांडावे लागते. निधीचे समान वाटपही होत नाही, असे दावे भाजपच्या सदस्यांनी केले आहेत. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेत पदाधिकारी विरुद्ध प्रशासन असे वाद सुरू अाहेत. किरकोळ मुद्यांवरून कामबंद करणे, आरोप प्रत्यारोप करणे आदी प्रकार सुरू आहेत. आपापसांत समन्वय नसल्याने जिल्ह्याच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांचे संपर्क अधिकारी पुलकेशी केदारे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांच्यात नुकताच वाद झाला. यावरून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. माझ्या कार्यालयाला हवी असणारी माहिती अधिकारी देत नाहीत. मध्यंतरी वित्त विभागात जाऊन भेट द्यावी लागली होती, असे सांगून पाटील यांनी प्रशासनाच्या मनमानीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

शिक्षण समितीचे सदस्य व पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाशी संबंधित शाळांमध्ये बाके पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेत अनेक बाबी लपवून ठेवल्याचा आरोप केला. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. असाच प्रकार समाज कल्याण विभागाशी संबंधित भजनी मंडळांना आवश्‍यक साहित्य पुरवठ्याच्या निविदेवरून झाला. भाजपमध्ये या विषयावरून अंतर्गत मतभेद झाले. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी त्याबाबत शंका उपस्थित केली. ही ४३ लाखांची निविदा प्रक्रियाही लटकली आहे.

मध्यंतरी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी यांच्यात वाद झाला. दिवेकर यांनी आपल्याला अपमानाची वागणूक दिल्याचा आरोप तडवी यांनी केला होता. या वादांचा परिणाम विकासकामांवर होत असून, निविदा प्रक्रिया लटकल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com