agriculture news in marathi Opportunities in commercial rearing of bee keeping | Agrowon

मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक पालनाला संधी

डॉ. मिलींद जोशी
बुधवार, 20 मे 2020

मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व त्यातून मिळणारे मधाचे उत्पादन ही मनुष्यजातीला मिळालेली बहुमोल भेट आहे. मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे आज आपण पृथ्वीतलावर विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचा हिरवेपणा अनुभवू शकतो. मधमाशा नसत्या तर पृथ्वीतलावरील कित्येक वनस्पतीच्या प्रजातींची उत्पत्ती झाली नसती. तर कित्येक प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या असत्या. त्यांच्या संवर्धनाबरोबरच शास्त्रीय दृष्ट्या त्यांचे पालन करून हा व्यवसाय वाढवण्यास आज मोठी संधी आहे.

मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व त्यातून मिळणारे मधाचे उत्पादन ही मनुष्यजातीला मिळालेली बहुमोल भेट आहे. मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे आज आपण पृथ्वीतलावर विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचा हिरवेपणा अनुभवू शकतो. मधमाशा नसत्या तर पृथ्वीतलावरील कित्येक वनस्पतीच्या प्रजातींची उत्पत्ती झाली नसती. तर कित्येक प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या असत्या. त्यांच्या संवर्धनाबरोबरच शास्त्रीय दृष्ट्या त्यांचे पालन करून हा व्यवसाय वाढवण्यास आज मोठी संधी आहे.

एकूण पिकांच्या १५ टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते. तर ८५ टक्के पिकांमध्ये परपरागीभवन दिसून येते. त्यासाठीचा वाहक म्हणून मधमाशी, लहान भुंगे, ढालकिडे, पतंग आदींचा समावेश होतो. निसर्गाने अशा परागीभवनाच्या फुलांना आकर्षक रंग, सुगंध व स्वादिष्ट मधुर रस दिला आहे. ज्यामुळे हे कीटक परागीभवनासाठी त्याकडे आकर्षिले जातात. परागीभवनामुळे उत्पादनच नाही तर त्याची गुणवत्तासुद्धा वाढते.

ठळक बाबी

 • मेक ग्रेगोर या प्रसिद्ध परागीभवन तज्ज्ञांच्या मते मनुष्याच्या आहारातील एक तृतीयांश भाग सरळ किंवा अनपेक्षितपणे मधमाशी व अन्य किटकांद्वारे परागीभवन झालेल्या पिकांद्वारे मिळतो.
 • परागीभवनाद्वारे मिळणारे आर्थिक मूल्य वार्षिक ६० ते ७० अब्ज अमेरिकी डॉलर
 • भारतातही ८० पिकांमध्ये कीटकांद्वारे परागीभवन.
 • नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात कमी होत चाललेल्या परागीभवन करणाऱ्या सजीवांच्या कमी संख्येमुळे विविध पिकांमध्ये सरासरी २६ टक्के उत्पादन घट आढळली आहे.

मधमाशांची संख्या घटतेय

 • पिकांमध्ये रासायनिक कीडनाशकांचा अमर्यादित वापर, अनेक वर्षे एकाच क्षेत्रात एकच पीक घेणे, जंगलाचे घटते प्रमाण अशा विविध कारणांमुळे नैसर्गिक अन्न व निवारा यांचा नाश झाल्याने मधमाशांची संख्या कमी झाली आहे. काही व्यक्तींकडून अयोग्यरीत्या धूर करून मध गोळा कारणांमुळेही मधमाश्‍यांच्या वसाहतींचा नाश होत आहे. 
 • देशात मध उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. त्या तुलनेत परागीभवन क्रिया व त्यातील अभ्यासाकडे तितके लक्ष देण्यात आलेले नाही. पिकांचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी मधमाशी व अन्य परागीभवन करणाऱ्या किटकांचे जतन करण्याची गरज आहे.

कीटक संवर्धनाचे महत्वाचे मुद्दे

 • शेतात मध्यभागी अथवा एका कोपऱ्यात मधमाशी मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल अशी झाडे लावून बी पार्क बनवावे. त्यात कोणतेही  रासायनिक कीटकनाशक फवारू नये. 
 • ऊस, केळी, आंबा, चिकू आदी झाडांमध्ये मधमाशीला उपयोगी अशी मेथी, मोहरी, वाल आदी पिके घ्यावीत.
 • मध गोळा करणाऱ्या व्यक्तींना धुराचा उपयोग न करता वैज्ञानिक पद्धतीने मधमाशीला नुकसान न करता मध गोळा करण्याचे प्रशिक्षण देणे.
 • सामाजिक वनीकरण योजनेंतर्गत अधिकाधिक क्षेत्रात निलगिरी, लिंब, बोर, जांभूळ आदी वृक्षांची लागवड करावी. बांधावरसुद्धा ही झाडे लावता येऊ शकतात.

कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी टीप्स

 • एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. त्यात जैविक नियंत्रणाला जास्तीत जास्त महत्त्व द्यावे.
 • कीटकनाशकाचा वापर पिकाच्या फूल अवस्थेत करू नये.
 • कीटकनाशकांचा वापर करणे जरुरीचे असल्यास निंबोळीयुक्त किंवा मधमाशांना कमी हानीकारक रसायनांचा वापर करावा.
 • फवारणी सकाळी नऊच्या आधी किंवा सायंकाळी चारनंतर करावी.
 • भुकटीरूप कीटकनाशकाचा वापर करू नये. त्याऐवजी दाणेदार कीटकनाशके जमिनीत वापरून मधमाशांचा संपर्क टाळता येतो.
 • बीजप्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत कीटकनाशकांचा वापर टाळता येतो.
 • शेतात मधमाश्यांच्या पेट्या ठेवले असल्यास कीटकनाशके फवारताना पेटीचा दरवाजा आदल्या दिवशी सायंकाळी बंद करावा.

भारतात आढळणाऱ्या मधमाशांच्या प्रमुख जाती

 • रॉक बी (Apis dorsata)- आग्या मोहोळ 
 • लहान मधमाशी (Apis florea)- फुलोरी 
 • भारतीय मधमाशी (Apis cerana indiaca)- सातेरी 
 • युरोपियन बी (Apis melifera) एपीस मेलीफेरा 
 • ट्रायगूना (Triguna)- पोयाची माशी 

ठळक बाबी

 • पहिल्या दोन प्रजाती आपण मधपेटीत वाढवू शकत नाही.
 • परागकण गोळा करणे या गोष्टीला पर्याय नाही. कारण परागकण हे मधमाशांच्या पिल्लांचे व पौढांचे अन्न आहे.  
 • मधमाशी खूप कार्यक्षम कीटक आहे. त्यामुळे फळझाडे व अन्य पिकांत परागकण वितरण करून उत्पादन वाढविणे शक्‍य होते.

मधमाशांद्वारे परागीभवन होणारी पिके 

 • फळझाडे व भाजीपाला - लिंबू, संत्रा,  मोसंबी, बदाम, सफरचंद, अक्रोड,  चेरी, डाळिंब, आंबा, नारळ, आवळा,  टरबूज, पपई, स्ट्रॉबेरी, भेंडी, वांगी,  टोमॅटो,  कारले, पडवळ, भोपळा, काकडी आदी
 • कडधान्य व तेलवर्गीय- कापूस,  सूर्यफूल, चवळी,  मटकी, उडीद,  मूग,  तूर, वाल व घेवडा
 • बीजोत्पादनासाठी - कोबी, फ्लावर, कोथिंबीर, मुळा, कांदा, मेथी, गाजर, लवंग
 • तृणधान्य- ज्वारी,  बाजरी, मका

परागीभवन टिकवण्यासाठी घ्यावयाची काळजी

 • प्रति हेक्टर क्षेत्रात मधपेट्यांची किती संख्या ठेवावी हे त्या पेटीतील मधमाशांची संख्या, परागीभवन करणाऱ्या अन्य किटकांची संख्या, पिकाचे क्षेत्र,  शेजारील पीक आदी बाबींवर अवलंबून असते. 
 • मधपेट्या पिकाच्या २९ टक्के फुलावस्थेत  सुरुवातीला शेतात ठेवाव्यात.
 • मधमाशा  साडेएकरा किलोमीटरपर्यंत दूर जाऊ शकतात. परंतु परागीभवनासाठी -.४० किमी अंतर असावे.
 • मधपेटी जेवढी जवळ तेवढा तिचा परागकण गोळा करण्यास लागणारा कालावधी कमी.
 • पेटी सायंकाळच्या वेळी शेतात ठेवावी. पेट्या जवळ जवळ न ठेवता विरुद्ध दिशेला ठेवाव्यात.
 • पेटीला विविध रंगीत लेबल लावावेत. जेणेकरून मधमाशी पेटी ओळखू शकेल. 

मधमाशीला फुलाकडे आकर्षित कसे करावे? 

 • साखरेच्या द्रावणाच्या भांड्यात  ज्या त्या पिकाची फुले थोडावेळ बुडवून ठेवावी.  त्यानंतर ते द्रावण मधमाशीला खुराक म्हणून ठेवावे.
 • शेतात साखरेच्या द्रावणाची फवारणी करावी. जास्त प्रमाणात पाणी दिल्याने फुलांचा रस आकर्षक राहत नाही. 
 • मधपेटी अशा ठिकाणी ठेवावी की जेथे सूर्याची पहिली किरणे तिच्या दरवाजावर पडतील. जेणेकरून मधमाशी लवकर कार्यरत होईल.

विविध उपक्रम

 • बारामती कृषी विज्ञान केंद्र आज राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मधमाशीसंबंधी विविध उपक्रम राबवत आहे.
 • सन २०१२ पासून शेतकऱ्यांना मधमाशीपालन प्रशिक्षण देण्यात येत आहे. डाळिंब व अन्य पिकांमध्ये परागीभवनासाठी मधपेटया भाडेतत्वावर दिल्या जातात.
 • सन २०१५ मध्ये मधमाशी संवर्धनासाठी आशिया खंडातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबवला. यात दोनहजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले. यात डाळिंब, शेवगा, कांदा बिजोत्पादन, सुर्यफूल आदी पिकांमध्ये साधारण १५ ते ४० टक्के उत्पादन वाढ दिसून आली. रासायनिक फवारण्या कमी होऊन उत्पादन खर्च कमी झाला. ,
 • सन २०१८ पासून केंद्रामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद (नवी दिल्ली) यांच्यामार्फत अखिल भारतीय समन्वयीत मधमाशी व परागीभवन कीटक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात देशात एकूण २६ संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. महाराष्ट्रासाठी बारामतीच्या एकमेव कृषी विज्ञान केंद्राचा त्यात समावेश आहे. या प्रकल्पाद्वाके आजपर्यंत पंधराशेपेक्षा जास्त व्यक्तींना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
 • या प्रकल्पांतर्गत आदिवासी भागातील युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना मधमाशीपालक उद्योजक बनविण्याचे काम केले जाते. त्या अंतर्गत दोन वर्षात नंदूरबार जिल्ह्यातील खांडबारा तालुक्यात तीन प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली. एकूण ८५ ग्रामीण युवक व महिलांना मधपेटी व साहित्याचे वाटप करण्यात आले. आज तेथील उपलब्ध फुलोऱ्यामुळे पेट्या चांगल्या पद्धतीने वाढून काही तरुणांनी मधपेटीतून मध काढून विक्री सुरू केली आहे.
 • संस्थेच्या विश्वस्थ सौ सुनंदा पवार यांच्या पुढाकाराने दरवर्षी भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये दुर्गम भागातील तरुण महिला उद्योजक गटांमार्फत मधविक्रीसाठी भाग घेतात.

संपर्क- डॉ. मिलींद जोशी- ९९७५९३२७१७
लेखक बारामती कृषी विज्ञान केंद्रात विषय विशेषज्ज्ञ आहेत.)


फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
शाश्‍वत भविष्यासाठी मृदा संवर्धनाकडे...मृदा दिन या संकल्पनेचे एक प्रमुख उद्‌गाते व...
गुणवंत मेंढी पैदाशीसाठी नर, मादीची निवडमेंढ्यांमध्ये निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक...
तंत्र दर्जेदार मुरघास निर्मितीचेमुरघास तयार करताना एकदल चारा आणि द्विदल चारा...
दूध संकलन केंद्रावर घ्यावयाची दक्षतादूध संकलन केंद्र स्वच्छ आणि हवेशीर असावे. जमिनीवर...
स्वच्छ, सुरक्षित दूध उत्पादनाचे तंत्रअसुरक्षित दुधापासून क्षय, विषमज्वर, अतिसार, कॉलरा...
औषधी अळिंबीचे आहारातील महत्त्वअळिंबीमध्ये मॉइश्‍चरायझिंग गुणधर्म असतात. हे...
शेळ्या, मेंढ्यांचे हिवाळ्यातील संगोपनशेळी-मेंढीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू...
जनावरांतील विषाणूजन्य आजार ः तिवातिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक...
कोणत्या गुणधर्माच्या पीकजातींची पैदास...एखाद्या पिकातील योग्य ते गुणधर्म पुढील पिढीमध्ये...
थंडीमध्ये द्या जनावरांना पोषक आहार हिवाळ्यात जनावरांना शारीरिक तापमान संतुलित...
लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी लसीकरण हाच...लाळ्या खुरकूत हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा...
चिंचेपासून जॅम, जेली, स्क्वॅशमहाराष्ट्रात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
कासदाहाकडे नको दुर्लक्ष... कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, दूषित उपकरणे तसेच...
जनावरांतील पोटाचे आजार कसे ओळखाल?जनावरांना रवंथ करण्यासाठी दिवसातून किमान ८-१०...
नवीन प्राणिजन्य आजार ः क्रिमियन काँगो...क्रिमियन काँगो हिमोरेजिक फीवर या आजाराचा प्रसार...
ओळख अळिंबी उत्पादनाची...अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...
काळपुळी आजाराबाबत दक्ष राहा...साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
जनावरांना द्या संतुलित आहारगाई, म्हशींसाठी, संतुलित आहार नियोजन केल्यास...
अळिंबी उत्पादनात मोठी संधी अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...