कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या संधी : डॉ. पटेल

कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या संधी : डॉ. पटेल
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या संधी : डॉ. पटेल

अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर, बायोपेस्टीसाईड, कृषी अवजारे निर्मिती, अल्गीपासून बायोफ्युएल निर्मिती उद्योगाच्या भरपूर संधी आहेत. मधमाशी पालन व त्यापासून सहदनिर्मिती, फूलशेती हेही कृषी आधारित उद्योगाचे चांगले पर्याय आहेत, असे मत गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी व्यक्त केले. 

‘कृषी व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास'' या विषयावर आधारित दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‍घाटन झाले. या वेळी उद्‍घाटक म्हणून डॉ. पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरुरू डॉ. व्ही. एम. भाले होते. राहुल श्रीवास्तव, डाॅ. रामकिशोर सिंह, विजय नदीमती, डाॅ. पंकज पाथ्रे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डाॅ. एम.बी. नागदेवे, संचालक डाॅ. व्ही. के. खर्चे, कुलसचिव डाॅ. पी. आर. कडू उपस्थित होते.

भारताचे शेतीमध्ये २०२० पर्यंत प्रतिहेक्टर २.५ किलोवॉट ऊर्जा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या त्याचे प्रमाण १.६ किलोवॉट प्रतिहेक्टर असल्याचीही माहिती डॉ. पटेल यांनी दिली. 

 प्रकल्पाचे अन्वेषक डाॅ. एस. आर. काळबांडे यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेविषयी माहिती दिली. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उद्योग निर्मिती व रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणे ही देशाची आजच्या काळाची गरज आहे, असे इंडियन सोसायटी आॅफ अॅग्री इंजिनिअरिंगचे अध्यक्ष प्रा. इंद्रमणी यांनी सांगितले.

डाॅ. ए. एस. धवन म्हणाले की, विदर्भ व मराठवाड्यात कृषीच्या समस्या सारख्याच आहेत. कृषी विद्यापीठांची भूमिका ही कृषी उद्योग निर्मितीत महत्त्वाची आहे. पुढील हरीत क्रांतीत कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका असल्याचे डाॅ. भाले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com