राळा, नाचणी, वरईच्या प्रक्रिया उद्योगात संधी : डॉ. एस. एस. राव

Opportunities in resin, drapes, wool processing industry : Dr. S. S. Rao
Opportunities in resin, drapes, wool processing industry : Dr. S. S. Rao

सोलापूर : "भरडधान्यातील राळा, वरई, नाचणी, बाजरी यांसारख्या धान्याची पौष्टिकता चांगली आहे. त्यांच्यातील या गुणधर्मामुळेच बाजारात त्याच्या उपपदार्थांना मागणी आहे. शेतकऱ्यांनी या बाजाराचा अभ्यास करून त्याच्या प्रक्रिया उद्योगाकडे वळावे, '' असे आवाहन हैदराबाद येथील भारतीय भरडधान्य संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. राव यांनी मंगळवारी (ता. १७) येथे केले. 

सोलापुरातील रब्बी ज्वारी संशोधन केंद्रातर्फे आयोजित भरडधान्य उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगावरील एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्‌घाटन सत्रात डॉ. राव बोलत होते. रब्बी ज्वारी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. के .के. शर्मा, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बी. सुब्बारायडू, राष्ट्रीय डाळिंब केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दिनेश बाबू, डॉ. आर. आर. चापके, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एल. आर. तांबडे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे आदी उपस्थित होते. 

डॉ. राव म्हणाले, "बाजरी, ज्वारी, वरई, नाचणी ही सर्व पीके सोलापूरसारख्या दुष्काळी भागात अधिक आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया या भागांतही त्याचे उत्पादन चांगले आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत त्यांचे क्षेत्र आणि उत्पादकता कमी होत आहे. पण आज याच धान्यांना ग्राहकांची चांगली पसंती आहे, हे ओळखून त्यात काम व्हावे. संशोधन केंद्र म्हणून आम्हीही त्यादृष्टीने विविध तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचाही लाभ घ्यावा, विशेषतः शेतकरी आणि महिलांना त्यामध्ये भरपूर वाव आहे.’’ 

‘‘रागी, नाचणीच्या उपपदार्थांना अधिक मागणी आहे. आज कोणत्याही शेतमालाचे मूल्यवर्धन झाल्याशिवाय जादाचे पैसे मिळत नाहीत, हे लक्षात घ्या,'''' असे आवाहनही डॉ. राव यांनी केले. 

डॉ. के. के. शर्मा यांनी ज्वारीच्या  विविध वाणांची आणि उत्पादनाची माहिती दिली. दुपारच्या सत्रात डॉ. परशुराम पात्रोटी यांनी ‘भरडधान्यांची शेती आणि त्याच्या धान्याचे आरोग्याच्या दृष्टीने उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन केले. ज्वारीच्या विविध वाणावर डॉ. एस. वाय. संबूर, भरडधान्यातील कीड-रोगांवर डॉ. शर्मा यांनी मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com