Agriculture news in Marathi Opportunity for 30 farmers in state level 'Atma' committee | Agrowon

राज्यस्तरीय ‘आत्मा’ समितीत ३० शेतकऱ्यांना संधी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेला (आत्मा) चालना देण्यासाठी राज्यस्तरीय समितीचे सहा वर्षांनंतर पुनर्गठन होत आहे. या समितीत ३० शेतकऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिल्या आहेत.

पुणे ः राज्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेला (आत्मा) चालना देण्यासाठी राज्यस्तरीय समितीचे सहा वर्षांनंतर पुनर्गठन होत आहे. या समितीत ३० शेतकऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिल्या आहेत. 

जिल्हास्तरीय समितीमधील एक शेतकरी सदस्य राज्यस्तरीय समितीत देखील घ्यावा, महिलांसह विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांना  समितीत संधी द्यावी, असे आयुक्तांनी राज्यातील ‘आत्मा’च्या सर्व प्रकल्प संचालकांना सूचित केले आहे. 

राज्यस्तरीय समितीत सर्व स्तरांना संधी देण्यासाठी आयुक्तांनी स्वतःहून काही जिल्हे प्रवर्गनिहाय आरक्षित केले आहेत. त्यानुसार अनुसूचित जमाती-पुरूष प्रवर्गासाठी गडचिरोली; तर अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी नंदूरबार आरक्षित असेल. याशिवाय अनुसूचित जाती-महिला प्रवर्गासाठी अमरावती; तर अनुसूचित जाती-पुरुष प्रवर्गाकरिता नांदेड आरक्षित राहील. 

चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, परभणी, उस्मानाबाद, लातूर, बीड, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि पालघर हे जिल्हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असतील. 

‘आत्मा’च्या जिल्हास्तरीय शेतकरी सल्ला समित्या १५ मेपर्यंत कार्यान्वित करा, असे क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. ‘कोविड’मुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे निवडीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, काही जिल्ह्यात अजूनही समित्या स्थापन झालेल्या नाहीत. परिणामी शेतकरी प्रतिनिधींची ३० सदस्य संख्या असलेली राज्यस्तरीय समितीदेखील कार्यान्वित झालेली नाही. येत्या दोन महिन्यात समिती तयार होण्याची शक्यता आहे. यात २५ सदस्य जिल्हास्तरावरून; तर पाच सदस्य मंत्रालयस्तरावरून निवडले जाणार आहेत. 

प्रत्येक तालुक्यात ‘आत्मा’च्या शेतकरी सल्ला समित्या स्थापन करण्याचे आदेश आयुक्तांनी चार महिन्यांपूर्वीच दिले होते. मात्र  अनेक तालुक्यात या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही. 

‘‘आतापर्यंत २५० तालुक्यांमधील समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे.शेतकरी सदस्यांच्या निवडीसाठी आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळेदेखील नावे निश्‍चित करण्यास काहीसा विलंब होतो आहे. मात्र जिल्हास्तरीय नावे अंतिम होताच, राज्यस्तरीय समितीचे कामकाज तत्काळ मार्गी लागेल,’’ अशी माहिती ‘आत्मा’च्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागात ‘आत्मा’साठी मोठ्या प्रमाणात निधी, अनुदान नसते. मात्र नावीन्यपूर्णता आणि विस्तार कार्याला ‘आत्मा’ची मोलाची मदत होते. क्षेत्रीय पातळीवरील नावीन्यपूर्ण बाबी राज्याच्या व्यासपीठावर येण्यास राज्यस्तरीय समिती उपयुक्त ठरले. धोरणात्मक अडचणी किंवा एका जिल्ह्यातील चांगल्या संकल्पनांचा राज्यभर विस्तार करण्याच्या हेतूने राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन केले जात आहे.
- किसनराव मुळे, कृषी संचालक (आत्मा),  कृषी आयुक्तालय


इतर अॅग्रो विशेष
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...