agriculture news in Marathi opportunity for agriculture startup in India Maharashtra | Agrowon

देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता बावी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा स्टार्टअप भारतातील असतो. भारतात शेतीशी संबंधित स्टार्टअप प्रकल्पांना खूप वाव आहे. काटेकोर शेती, मार्केट लिंकेजेस, पुरवठा साखळी आदी क्षेत्रात अनेक संधी आहेत.

पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा स्टार्टअप भारतातील असतो. भारतात शेतीशी संबंधित स्टार्टअप प्रकल्पांना खूप वाव आहे. काटेकोर शेती, मार्केट लिंकेजेस, पुरवठा साखळी आदी क्षेत्रात अनेक संधी आहेत. स्टार्टअप कंपन्यांसोबत तंत्रज्ञान भागीदारी करण्याचे व त्यांना डिजिटल सेवा पुरवण्याचे मायक्रोसॉफ्टचे धोरण आहे, अशी माहिती ‘स्टार्टअप इकोसिस्टिम, मायक्रोसॉफ्ट''च्या संचालक संगीता बावी यांनी दिली. ॲग्रो व्हिजन फाउंडेशन आणि ॲग्रो स्पेक्ट्रम यांच्या वतीने ‘कृषी स्टार्टअप्सः संधी व आव्हाने' या विषयावर शुक्रवारी (ता. १०) आयोजित वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या.

‘‘देशात दरवर्षी ५० हजार कृषी पदवीधर विद्यापीठांतून बाहेर पडतात; परंतु कृषी उद्योजकता विषयाबद्दल त्यांच्यामध्ये फारशी जाणीवजागृती नाही,’’ असे निरीक्षण नॅशनल ॲकेडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंटचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी नोंदवले. 

भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे शेतीशी संबंधित स्टार्टअप प्रकल्पांना उत्तेजन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व योजनांची माहिती त्यांनी दिली. देशात कमी जमीनधारणा क्षेत्र ही प्रमुख समस्या असली तरी एफपीओ, एफपीसीच्या माध्यमातून त्यावर मात करणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘‘देशात ॲग्री क्लिनिक्स ॲन्ड ॲग्री बिजनसे सेंटर योजनेच्या माध्यमातून सुमारे ७२ हजार प्रकल्प उभे राहिले; परंतु त्यातील केवळ चार टक्के प्रकल्पांना बॅंकांकडून कर्ज मिळाले,’’ अशी माहिती मॅनेजच्या कृषी विस्तार विभागाचे संचालक डॉ. राज सरवानन यांनी दिली.

‘‘राष्ट्रीय संशोधन विकास परिषदेकडे कृषी स्टार्टअप विषयक शेकडो नवीन कल्पनांचा साठा असून उद्योजकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होईल,’’ असे मत परिषदेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पुरूषोत्तम यांनी व्यक्त केले. पेटंट नोंदवण्यासाठीही परिषद मदत करत असल्याची माहिती त्यांनी दिली. ॲग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर यांनी चर्चेचा समारोप केला.  

सरकारची धोरणे अनुकूल 
लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढल्यामुळे अन्‍न क्षेत्रातील स्टार्टअप प्रकल्पांना खूप वाव आहे. तसेच प्रक्रिया, निर्यात, साधसंपत्तीचे जतन, डेटा मॅनेजमेंट आदी विषयांतही मोठ्या संधी आहेत. कृषी स्टार्टअप प्रकल्पांसाठी सरकारची धोरणे अनुकूल आहेत. देशात कृषी स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर्सची संख्या वाढत आहे. परंतु तुकड्या तुकड्यांत विभागलेले क्षेत्र आणि स्थानिक मागणी तसेच हंगामी व्यवसाय, कमी आर्थिक गुंतवणूक ही स्टार्टअप उद्योगांपुढील आव्हाने आहेत, असे मॅनेजच्या कृषी विस्तार विभागाचे संचालक डॉ. राज सरवानन यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...