Agriculture news in Marathi Opportunity to guide tourism to 1000 youth in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यातील १००० तरुणांना पर्यटन मार्गदर्शकाची संधी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

राज्यातील १ हजार जणांना पर्यटन गाइड बनण्यासाठीचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. राज्याचे पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी माहिती दिली.

पुणे ः पर्यटनातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पर्यटन विभागाच्या वतीने १ हजार तरुणांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी तरुणांना टुरिस्ट गाइड बनण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी राज्य पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. यानुसार राज्यातील १ हजार जणांना पर्यटन गाइड बनण्यासाठीचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. राज्याचे पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी माहिती दिली.

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाइन आयआयटीएफ टुरिझम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्रामअंतर्गत मोफत पर्यटन मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व व्यक्तींना राज्य सरकारमार्फत प्रमाणित पर्यटन मार्गदर्शक (टुरिस्ट गाइड) म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यांना राज्यस्तरावर किंवा राज्यातील विविध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी टुरिस्ट गाइड म्हणून काम करता येईल, असेही डॉ. सावळकर यांनी स्पष्ट केले.

या डिजिटल उपक्रमामुळे इच्छुकांना त्यांच्या वेळेनुसार आणि ते ज्या ठिकाणी असतील तेथूनच त्यांच्या सवडीनुसार हे ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करता येणार आहे. हे प्रशिक्षण घेण्यासाठी १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींनी किमान बारावी तर, ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...