तृणधान्य पिकांमध्ये प्रक्रियेला संधी

शेती व्यवसायाच्या प्राथमिक अवस्थेपासून तृणधान्यांचा आहार आणि एकंदरीतच पीक लागवडीत मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू आणि अवर्षण प्रवण विभागातील शेतकरी पारंपारिक पद्धतीने ज्वारी, बाजरी आणि इतर तृणधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.
Opportunity to process in cereal crops
Opportunity to process in cereal crops

शेती व्यवसायाच्या प्राथमिक अवस्थेपासून तृणधान्यांचा आहार आणि एकंदरीतच पीक लागवडीत मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू आणि अवर्षण प्रवण विभागातील शेतकरी पारंपारिक पद्धतीने ज्वारी, बाजरी आणि इतर तृणधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. शेती व्यवसायाच्या प्राथमिक अवस्थेपासून तृणधान्यांचा आहार आणि एकंदरीतच पीक लागवडीत मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू आणि अवर्षण प्रवण विभागातील शेतकरी पारंपारिक पद्धतीने ज्वारी, बाजरी आणि इतर तृणधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. तृणधान्यांच्या पोषणमूल्यंविषयी पुरेशा माहिती अभावी उत्पादकांना आकर्षक बाजार भाव मिळत नाही. तरीदेखील पारंपारिक पद्धतीच्या लागवडीतील तृणधान्यांचा वाटा अद्यापही टिकून आहे. वैशिष्ट्ये  महाराष्ट्र हे तृणधान्य पिकांचे कोठार समजले जाते. ज्वारी, बाजरी आणि इतर तृणधान्यांची लागवड महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. धुळे, जळगाव, नंदुरबार नगर, सोलापूर, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि कोकणपट्टीमध्ये स्थानिक तृणधान्यांची लागवड टिकून आहे. सर्व तृणधान्ये मुख्यतः कोरडवाहू पिके म्हणून घेतली जातात. तृणधान्य लागवडीमध्ये मुख्यतः छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. मूल्यसाखळी विकसित करण्याची गरज  तृणधान्यांचे उत्पादन आणि विक्री अद्यापही पारंपारिक पद्धतीनेच चालू आहे. या पिकांच्या बाजार भावाविषयी सांख्यिकी विश्लेषण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. पारंपारिक विक्री साखळीमध्ये अडतदार, व्यापाऱ्यांना धान्य विकले जाते. मूल्यवर्धन साखळी अद्यापही विकसित झालेली नाही. बाजारपेठांची स्थिती  बहुतेक सर्व तालुकास्तरावरील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धान्य प्रतवारी, चाळणी, पॅकिंग सुविधा उपलब्ध आहेत.परंतु शेतकऱ्यांसाठी किफायतशीर दरामध्ये गोदामांमध्ये साठवणूक सुविधांची कमतरता आहे. गोदाम सुविधांच्या अभावी शेतमाल तारण पावती आणि त्याआधारे मिळणारा पतपुरवठा याचा लाभ उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही. तृणधान्य शेतीसमोरील आव्हाने बदलती जीवनशैली, आहार शैलीमध्ये पारंपारिक तृणधान्ये दुर्लक्षित राहिली आहेत. वास्तवात ही सर्व तृणधान्ये पोषणमूल्यदृष्ट्या आणि तंतुमय घटकांनी परिपूर्ण आहेत. असे असूनही गहू आणि तांदूळ यांच्या तुलनेत बाजारपेठेत ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांचा मागणी आणि बाजार भाव देखील कमी आहे. सुधारित तंत्राचा अभाव, अपुऱ्या सिंचन सुविधा, निविष्ठांचा कमी वापर आणि मूल्यवर्धन साखळीचा अभाव या मुख्य समस्या आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी या सारख्या पिकांच्यामध्ये अद्याप कोणतीही मोठी उत्पादक कंपनी कार्यरत नाही. वैद्यकशास्त्राने या तृणधान्यांची पोषकता परिपूर्णता चाचण्यांच्या आधारे सिद्ध केली आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारपेठेतील मागणी पाहता मूल्यवर्धन आणि विपणन साखळी उभारण्यास उत्पादक कंपन्यांना चांगली संधी आहे. संशोधन आणि विकास 

  • मोहोळ (जि.सोलापूर) येथे ज्वारी संशोधन केंद्र आहे. एम-३५-१ (मालदांडी) सारख्या वैशिष्ट्यपूर्ण चवदार जातीची निर्मिती या केंद्राद्वारे झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हुरडा आणि गोड चवीसाठी ज्वारीच्या विविध जाती विकसित केल्या आहेत. याचबरोबरीने डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठामध्येही तृणधान्य पिकांबाबत विशेष संशोधन केले जाते.
  • अमेरिका, युरोपीय देशांमध्ये सध्या ग्लुटेन फ्री आहाराबाबत जागरूकता वाढली आहे. महाराष्ट्रातील दुर्लक्षित तृणधान्ये ही ग्लुटेन फ्री आहेत. त्यामुळे बाजारपेठेचा कल पाहता तृणधान्यांपासून बिस्किटे, कुकीज तसेच पूरक आहार विविध आकर्षक स्वरूपात विक्रीची चांगली संधी आहे. हे लक्षात घेता सुधारित लागवड तंत्राचे प्रशिक्षण, प्रसार, काढणी पश्‍चात तंत्रज्ञानावर अधिक संशोधनाची गरज आहे.
  • तृणधान्यांच्या नियमित आहारातील समावेशाने मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब हृदयविकार, यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविता येते, हे वैद्यकशास्त्राने सिद्ध केले आहे. त्यामुळे मानवी आहार, उपचारामधील तृणधान्यांचे महत्त्व लक्षात घेता कोरडवाहू,अवर्षण ग्रस्त भागातील सीमांत अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पिकातून व्यावसायिक संधी आहे. या शेतकऱ्यांना मूल्यवर्धन साखळी उभारण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि वित्त संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.
  • संपर्क -विजयकुमार चोले, ९४२०४९६२६० (उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com