agriculture news in marathi, opposition Aggressive on bollworm issue | Agrowon

बोंड अळीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले; मात्र शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्याचा मुद्दा मांडत भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी बोंड अळीचा प्रश्न वेगळा असताना तो गारपिटीत समाविष्ट करून सरकारकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करत विधानसभेचे कामकाज रोखून धरले. त्यामुळे विधानसभेचे बुधवारी (ता. २८) कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले; मात्र शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्याचा मुद्दा मांडत भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी बोंड अळीचा प्रश्न वेगळा असताना तो गारपिटीत समाविष्ट करून सरकारकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करत विधानसभेचे कामकाज रोखून धरले. त्यामुळे विधानसभेचे बुधवारी (ता. २८) कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नियम ९७ अन्वये प्रस्ताव मांडत बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली; मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांच्या मागणीला सुरवातीला नकार दिला. त्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्याने दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. या वेळी भाजप आमदार अनिल बोंडे यांनी विरोधकांवर उपरोधिक टीका करत विरोधकांनो, विरोध करण्यासाठी टॉनिक घेऊन येत जा, असे म्हणत विरोधकांना डिवचले.

या वेळी हरकतीचा मुद्दा घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विरोधकांच्या नियम ९७ अन्वये चर्चा करत प्रश्नोत्तराचा तास रद्द करा, अशी मागणी केली होती. म्हणून तुम्ही प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावावर चर्चा करा, त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, “तुम्ही चर्चेची मागणी केली, त्यावर मी चर्चा सुरू केली आहे. तुम्ही खाली बसा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच चर्चा सुरू आहे. तुम्ही ऐकून घ्या. जाग्यावर बसा. अनिल बोंडे तुम्ही प्रस्तावावर चर्चा सुरू करा. ’’

भाजप आमदार अनिल बोंडे म्हणाले, “विरोधकांचे शेतकऱ्यांवरचे प्रेम किती ढोंगी आहे ते कळते आहे. शेतकरी प्रश्नांवर चर्चा सुरू असताना ते गोंधळ घालत आहेत. विरोधक वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यामुळे ते गोंधळ घालत आहेत. या वेळी राज्य सरकारने एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचा दावा केला. त्यावर विरोधकांनी गारपिटीसोबतच बोंड अळीवरही चर्चा करण्याची मागणी केली.’’

दरम्यान, तिसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा एकदा विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याप्रश्नी अध्यक्षांच्या दालनात विरोधकांसोबत बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी विनंती तालिका अध्यक्ष योगेश सागर यांना केली. त्यानुसार योगेश सागर यांनी पुन्हा सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. अखेर सत्ताधारी आणि विरोधकांचे दोन वेगवेगळे प्रस्ताव एकत्रित करून त्यावर आज (गुरुवारी) चर्चा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. 

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...